Mumbai Crime News Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai News : आधी आईला दारू पाजली, नंतर मुलीवर बलात्कार केला; धक्कादायक घटनेनं मुंबई हादरली

Mumbai Crime News : पत्नीला दारु पाजून एका नराधम बापाने आपल्या 13 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केला. ही संतापजनक घटना मुंबईमधील पश्चिम उपनगरात घडली.

Satish Daud

पत्नीला दारु पाजून एका नराधम बापाने आपल्या 13 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केला. हा प्रकार कुणालाही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली. ही संतापजनक घटना मुंबईमधील पश्चिम उपनगरात घडली. याप्रकरणी पीडित मुलीच्या मावशीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केलाय.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित 13 वर्षीय मुलगी मुंबईतील पश्चिम उपनगर परिसरात राहते. तिच्या वडिलांना दारुचे व्यसन आहे. 27 जुलै रोजी पीडित मुलीचा बाप घरी दारु घेऊन आला. त्याने आपल्या पत्नीसोबत बसून मद्यपान केले.

मद्यपान केल्यानंतर पीडितेच्या आईच्या शुद्ध हरपली. याच गोष्टीचा फायदा घेऊन आरोपी बापाने आपल्या 13 वर्षीय मुलीवर बलात्कार केला. हा प्रकार कुणालाही सांगितल्यास तुला जीवे मारून टाकेन, अशी धमकी देखील आरोपीने पीडितेला दिली.

या संपूर्ण प्रकारानंतर पीडिता प्रचंड घाबरली. तिने सुरुवातीला हा प्रकार कुणालाही सांगितला नाही. मात्र, काही दिवसांनी पीडितेला तिची मावशी भेटायला आली. तेव्हा पीडित मुलीने आपल्यासोबत घडलेला सर्व प्रकार मावशीला सांगितला.

जन्मदात्या बापानेच मुलीवर अत्याचार केल्याचं कळताच मावशीच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी तातडीने मुलीला सोबत घेऊन पोलीस ठाणे गाठले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्याअंतर्गत (पोक्सो) गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा अधिकचा तपास पोलीस करीत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Virat Kohli Birthday : 'बापमाणूस' विराट कोहली! पत्नी अनुष्काचा प्रेमवर्षाव, नवऱ्यासाठी खास पोस्ट

Maharashtra News Live Updates: महायुतीची आज कोल्हापूरमध्ये मोठी प्रचार सभा

Azaad Teaser Released : अजय देवगणचा 'आझाद' येतोय; मामा-भाचा एकाच सिनेमात, अॅक्शनचा धमाका, टीझर पाहाच!

VIDEO : आम्हाला त्यांच्या प्रमाणपत्राची गरज नाही, राज ठाकरेंच्या 'त्या' विधानावर राऊतांची प्रतिक्रिया | Marathi News

Sangli Politics: लोकसभेप्रमाणे विधानसभेतही बंडखोरीचा पॅटर्न; सांगलीत काँग्रेस खासदाराची अपक्ष उमेदवाराला साथ

SCROLL FOR NEXT