Pune Shocking News  Saam Tv
मुंबई/पुणे

Pune News: घरी जाताना भयंकर घडलं, इलेक्ट्रिक वायरचा शॉक लागून २ तरुणांचा जागीच मृत्यू; पुण्यात खळबळ

Pune Shocking News: पुण्यामध्ये इलेक्ट्रीक शॉक लागून दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. पुण्यातील औंधमध्ये ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास करत आहेत.

Priya More

अक्षय बडवे, पुणे

पुण्यामध्ये इलेक्ट्रिक वायरचा शॉक लागून २ तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. पुण्यातील ब्रेमेन चौकाजवळ ही घटना घडली. औंध परिसरात असणाऱ्या एमएसईबीच्या डीपीचा झटका लागून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृत्युमुखी पडलेल्यांपैकी एक रिक्षाचालक तर दुसरा नोकरदार आहे. विनोद चिंतामण क्षीरसागर (वय २९ वर्षे) आणि सौरभ विजय निकाळजे (वय २७ वर्षे) अशी मृत्युमुखी पडलेल्या दोघांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील औंध भागातील ब्रेमेन चौक येथील सार्वजनिक शौचालयाजवळ एमएसईबीची डीपी आहे. याठिकाणी दोन व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत पडलेले आहेत अशी माहिती स्थानिक नागरिकांनी पोलिस कंट्रोल रूमला कळवली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघेही तरुण बेशुद्धावस्थेत पडले होते. पोलिसांनी त्यांना तात्काळ एमएसईबीच्या कर्मचाऱ्यांना बोलावून घेतलं आणि विद्युत पुरवठा बंद करण्यास सांगितला.

त्यानंतर पोलिस आणि एमएसईबीच्या कर्मचाऱ्यांनी दोन्ही तरुणांना बाजूला काढले. तर दोघांचाही मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. दोन्ही तरुणांनाचे मृतदेह ताब्यात घेऊन पोलिसांनी शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. दोघांच्या मृत्यूची माहिती पोलिसांनी त्यांच्या कुटुंबीयांना कळवली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. यावेळी नागरिकांनी एमएसईबीवर संताप व्यक्त केला.

मृतांमधील विनोद चिंतामण क्षीरसागर हे रिक्षाचालक असून पुण्यातील औंधमधील कस्तुरबा गांधी वसाहतमधील रहिवासी होते. १३ तारखेला ते रात्री घरी न आल्याने त्यांच्या आईने पोलिसात तक्रार दिली होती. तर यातील दुसऱ्या व्यक्तीचे नाव सौरभ विजय निकाळजे असून तो नोकरदार होता. पुण्यातील कोथरूड भागात तो रहायला होता. तो रिक्षाने घराकडे निघाला होता तेव्हा ही घटना घडली. याबाबत चतुशृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुण्यात भाजपचा गड ढासळला; बड्या नेत्याचा पक्षाला रामराम, अजित पवारांना देणार साथ

Makeup Tips: जुने मेकअप प्रॉडक्ट्स वापरताय? होऊ शकतं इन्फेक्शन, अशी घ्या काळजी

Crime: ४ वेळा 'दृश्यम' चित्रपट पाहिला, नंतर बायकोला संपवलं; मृतदेह भट्टीत जाळला अन्..., पुणे हादरले

Maharashtra Live News Update: धुळ्यात मंकीपॉक्सचा सहावा रुग्ण; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Maharashtra Politics: पालघरमध्ये ठाकरे गटासह बविआला खिंडार; अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

SCROLL FOR NEXT