Mumbai : मुंबईत हवालदारानं स्वत:ला संपवलं, घरात संशयास्पद अवस्थेत आढळला मृतदेह

Mumbai News : मुंबईच्या विक्रोळी परिसरात खळबळजनक घटना घडली आहे. एका ५६ वर्षीय वाहतूक पोलीस हवालदाराचा मृतदेह त्याच्या घरात आढळला आहे. हवालदाराने आत्महत्या केल्याचे म्हटले जात आहे.
Mumbai News
Mumbai Newsx
Published On

Mumbai Shocking : मुंबईतील विक्रोळीमधून धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विक्रोळी वाहतूक विभागातील एका ५६ वर्षीय हवालदाराचा मृतदेह संशयास्पद स्थितीमध्ये त्याच्या राहत्या घरी आढळला. सकाळी साडेआठच्या सुमारास हा प्रकार समोर आला. हवालदाराने आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात म्हटले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्ती ही विक्रोळी वाहतूक विभागामध्ये पोलीस हवालदारा होती. सकाळी आठ-साडेआठच्या सुमारास हवालदाराच्या पत्नीला घरात त्याचा मृतदेह आढळून आला. पोलीस हवालदाराने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. स्थानिक पोलिसांनी अपघाती मृत्यूचा अहवाल नोंदवला आहे.

Mumbai News
Indian Army : भारतीय सैन्याचा ड्रोन हल्ला! बड्या दहशतवादी नेत्याचा खात्मा, १९ जण जखमी झाल्याचा दावा

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळाला भेट दिली. त्यांनी अपघाती मृत्यू अहवाल (एडीआर) नोंदवला आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलिसांनी चौकशी करायला सुरुवात केली आहे. आत्महत्येचे मूळ कारण शोधण्यासाठी पोलिसांचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Mumbai News
Pune Crime : पुणे हादरलं! पानटपरीवर जोरदार राडा, कोयत्याने झालेल्या हल्ल्यात तरुण ठार

विक्रोळी वाहतूक विभागातील एका हवालदाराने आत्महत्या केली. राहत्या घरात त्याचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला. हवालदाराच्या पत्नीने सर्वात आधी त्याचा मृतदेह पाहिला. या घटनेनंतर स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. वाहतूक विभागातील हवालदाराने आत्महत्या का केली याचा शोध स्थानिक पोलीस घेत आहेत.

Mumbai News
Pune News : व्हेज नूडल्समध्ये सापडले चिकनचे तुकडे, रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेलेल्या शाकाहारी जोडप्याचा संताप

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com