Indian Army : भारतीय सैन्याचा ड्रोन हल्ला! बड्या दहशतवादी नेत्याचा खात्मा, १९ जण जखमी झाल्याचा दावा

National News : भारतीय सैन्याने उल्फा (आय) या दहशतवादी संघटनेने भारतीय सैन्याच्या ड्रोन हल्ल्यात आमच्या संघटनेतील बडा नेता मारला गेल्याचा दावा केला आहे. या घटनेची माहिती भारतीय सैन्याने नाकारली आहे.
drone
dronex
Published On

India Army : भारतीय सैन्याने म्यानमारच्या सीमेवर ड्रोन केल्याचे म्हटले जात आहे. या हल्ल्यामध्ये उल्फा (आय) या दहशतवादी संघटनेच्या मोठा नेता मारला गेल्याचे म्हटले जात आहे. म्यानमारच्या सागाईंग प्रदेशातील उल्फा (आय) संघटनेने त्यांचा नेता भारताच्या ड्रोन हल्ल्यात मारला गेल्याचा आणि १९ जण जखमी झाल्याचा दावा केला आहे. पण संरक्षण प्रवक्त्यांनी या घटनेची माहिती नाकारली आहे. लष्कराने अशा कोणत्याही कारवाईची माहिती नसल्याचे म्हटले आहे.

उल्फा (आय) संघटनेने दिलेल्या निवेदनानुसार, पहाटे अनेक मोबाइल छावण्यांवर ड्रोन हल्ले करण्यात आले. हल्ल्यांमध्ये संघटनेचा मोठा नेता मारला गेला आहे, तर दहशतवादी संघटनेतील १९ जण जखमी झाले आहेत. उल्फाच्या दाव्यावर लेफ्टनंट कर्नल महेंद्र रावत यांनी 'भारतीय सैन्याला अशा कोणत्याही कारवाईची माहिती नाही', असे वक्तव्य केले आहे. ड्रोन हल्ल्यामध्ये एनएससीएन-केच्या छावण्यांना लक्ष्य करण्यात आले. त्या संघटनेचे अनेक लोकही हल्ल्यात जखमी झाल्याचा दावा उल्फाने केला आहे.

drone
Maharashtra Politics : जयंत पाटील तुमच्या पक्षात येणार का? अजित पवार यांनी स्पष्टच सांगितलं

युनाटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम म्हणजे उल्फा ही आसाममध्ये सक्रिय असलेली मोठी दहशतवादी संघटना आहे. १९७९ मध्ये या संघटनेची स्थापना करण्यात आली होती. सशस्त्र संघर्षाद्वारे आसामला स्वायत्त आणि सार्वभौम राज्य बनवण्यासाठी परेश बरुआ यांनी त्यांच्या साथीदारांसह या संघटनेची स्थापना केली होती.

drone
Pune Crime : पुणे हादरलं! पानटपरीवर जोरदार राडा, कोयत्याने झालेल्या हल्ल्यात तरुण ठार

केंद्र सरकारने १९९० मध्ये उल्फा संघटनेवर बंदी घातली होती. याविरोधात लष्करी कारवाई देखील सुरु करण्यात आली होती. २००८ मध्ये संघटनेचा नेता अरबिंदा राजखोवा याला बांगलादेशमधून अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला भारताकडे सोपवण्यात आले होते. उल्फाच्या दहशतीमुळे अनेक चहा व्यापाऱ्यांनी आसाम सोडले होते.

drone
Ind Vs Eng : ४, ४, ६... मग पुढच्या ओव्हरमध्ये क्लीनबोल्ड, आकाश दीपने हॅरी ब्रूकच्या दांड्या उडवल्या; पाहा Viral Video

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com