
Pune : पुण्यातील गुडलक कॅफेमध्ये बनमस्कामध्ये काचेचा तुकडा सापडला होता. त्यानंतर एका हॉटेलच्या जेवणामध्ये झुरळ आढळल्याची माहिती समोर आली होती. असाच आणखी एक किळसवाणा प्रकार पुन्हा घडला आहे. पुण्यातील एका मॉलमधील लोकप्रिय इंडो-चायनीज रेस्टॉरंटमध्ये व्हेज जेवणामध्ये चिकन देण्यात आल्याचा आरोप झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका जोडप्याने पुण्यातील एका मॉलमध्ये इंडो-चायनीज रेस्टॉरंटमध्ये व्हेज नूडल्स ऑर्डर केले होते. पण नूडल्समध्ये चिकनचे तुकडे होते, असा आरोप जोडप्याने केला आहे. 'आम्ही स्पष्टपणे व्हेज हक्का नूडल्स मागवले होते, तरीही नूडल्समध्ये चिकन आढळले', असे शाकाहारी जोडप्याने म्हटले आहे.
'आम्ही आजीवन शाकाहारी आहोत, ऑर्डर देताना आम्ही दोनदा विचारुन खात्री केली होती. शुद्ध शाकाहारी जेवणाबाबत आम्ही ताकीद दिली होती. पण जेवताना अचानक नूडल्समध्ये चिकनचे तुकडे आढळले. त्यावेळेस आम्हाला मोठा धक्का बसला', असे वक्तव्य जोडप्याने केले आहे. रेस्टॉरंटच्या निष्काळजीपणामुळे आमची धार्मिक भावना दुखावली गेल्याचे पती-पत्नीने म्हटले आहे.
यादरम्यान इंडो-चायनीज रेस्टॉरंट किंवा मॉल व्यवस्थापनाकडून यावर कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. या प्रकरणात जोडप्याने पोलीस तक्रार दाखल केलेली नाही. पण तरीही कायदेशीर कारवाई करणार असल्याचा विचार असल्याचे जोडप्याने म्हटले आहे. या एकूणच प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.