farmers rasta roko andolan at nagar manmad highway demands water supply Saam Digital
मुंबई/पुणे

Rasta Roko Andolan: पाण्यासाठी शेतकऱ्यांनी राेखला नगर मनमाड महामार्ग, रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा

अहमदनगर जिल्ह्यातील शेतक-यांनी पाण्याअभावी पिके करपण्याची भिती व्यक्त केली. शेतीच्या पाण्यासाठी आज शेतकऱ्यांनी राहुरी येथे एकत्र येत नगर मनमाड महामार्ग अडवला.

Siddharth Latkar

- सचिन बनसाेडे

मुळा धरणाच्या डाव्या कालव्यातून शेतीला आवर्तन सोडावे या मागणीसाठी आज (शुक्रवार) नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी नगर मनमाड महामार्गावर रास्ता राेकाे आंदाेलन छेडले आहे. या आंदाेलनामुळे नगर मनमाड महामार्गावरील वाहतुक खाेळंबली आहे. (Maharashtra News)

अहमदनगर जिल्ह्यातील शेतक-यांनी पाण्याअभावी पिके करपण्याची भिती व्यक्त केली. शेतीच्या पाण्यासाठी आज शेतकऱ्यांनी राहुरी येथे एकत्र येत नगर मनमाड महामार्ग अडवला. यावेळी आंदोलकांनी निवडणुका संपल्या त्यामुळे नेते मंडळी आता गावांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा दावा केला.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवी मोरे यांच्या नेतृत्वात आज आंदोलन छेडण्यात आले. या आंदोलनामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या हाेत्या. यावेळी आंदाेलकांनी सरकारवर राेष व्यक्त केला. जनावरांना पाणी नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. शेतक-यांना सरकारने वा-यावर साेडल्याचा आराेप आंदाेलकांनी केला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

Swiggy CEO networth : स्विगीचे सीईओंचं शिक्षण आणि नेटवर्थ किती?

Maharashtra News Live Updates: पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टर मधील बॅगांची करण्यात आली तपासणी

Viral Video: भंयकर वास्तव! पाय ठेवायला जागा नाही, तरीही भाऊचा लोकलच्या दारात उभं राहून प्रवास, व्हिडीओ पाहा

Solapur Airport : सोलापूरकरांचे नागरी विमानसेवेचे स्वप्न साकार! २० डिसेंबरपासून मुंबई आणि गोवासाठी विमानसेवा

Viral Video: नजर हटी... मोबाइलच्या नादात भरकटला, दुचाकी थेट कारला धडकली, थरारक घटना कॅमेऱ्यात कैद!

SCROLL FOR NEXT