Banana Farmers News Saam tv
मुंबई/पुणे

Banana Farmers News: केळी उत्पादक शेतकऱ्यांना पीकविमा भरण्यासाठी ३ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ : कृषिमंत्री धनंजय मुंडे

Banana Farmers Crop Insurance: केळी उत्पादक शेतकऱ्यांना पीकविमा भरण्यासाठी ३ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ : कृषिमंत्री धनंजय मुंडे

Satish Kengar

Banana Farmers Crop Insurance:

प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत फळ पीक विमा योजनेत केळी पिकाचा विमा भरण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांना ३ नोव्हेंबर २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विटद्वारे दिली आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत हवामान आधारित फळ पीक विमा योजनेमध्ये केळी या पिकाचा विमा भरण्यास ३१ ऑक्टोबर २०२३ अंतिम मुदत देण्यात आली होती. ३१ ऑक्टोबर पर्यंत सुमारे ४५ हजार ७३१ अर्जदारांनी केळी पिकासाठी विमा योजनेत सहभाग घेतला होता. (Latest Marathi News)

तांत्रिक अडचणींमुळे काही केळी उत्पादक शेतकरी या योजनेत ठराविक वेळेत सहभागी होऊ शकले नव्हते. त्यामुळे मंत्री मुंडे यांनी केंद्राकडे मुदतवाढ देण्याबाबत विनंती केली होती.

मंत्री मुंडे यांची ही विनंती मान्य करण्यात आली असून, ३ नोव्हेंबर २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मंत्री मुंडे यांनी केळी उत्पादक शेतकऱ्यांनी या योजनेतील सहभाग वाढवून आपला विमा निर्धारित वेळेत भरून घ्यावा, असे आवाहनही केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT