Santosh Bangar Viral Clip: फी न भरल्याने परीक्षा देण्यापासून रोखलं, आमदार बांगर यांनी शिक्षिकेला झापलं; ऑडिओ क्लिप Viral

Santosh Bangar Viral Audio Clip: फी न भरल्याने परीक्षा देण्यापासून रोखलं, आमदार बांगर यांनी शिक्षिकेला झापलं; ऑडिओ क्लिप Viral
Santosh Bangar Viral Audio Clip
Santosh Bangar Viral Audio ClipSaam Tv
Published On

Santosh Bangar Viral Audio Clip :

नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असणारे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. बंडगर यांची पुन्हा एकदा एकदा एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. विद्यार्थ्याने शाळेची फिस भरली नाही म्हणून शिक्षकांनी त्याला वर्गात बसू दिलं नाही. यावरुन आमदार संतोष बांगर यांनी शिक्षकाचीच शाळा भरवल्याचा दावा करण्यात येत आहे.

व्हायरल ऑडिओ क्लिपमध्येनेमकं घडलं तरी काय?

या व्हायरल कथित ऑडिओ क्लिपमध्ये शिक्षकांची खरडपट्टी काढणाऱ्या व्यक्तीचा आमदार संतोष बांगर यांचा असल्याचा दावा केला जातोय. हिंगोलीतल्या नामांकित अनूसया विद्यामंदिर शाळेतल्या फडणीस मॅडम यांच्याशी त्यांचा संवाद झालं असल्याचं बोललं जात आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Santosh Bangar Viral Audio Clip
MLA Disqualification Case: आमदार अपात्रता प्रकरणी मोठी अपडेट; याचिकेवर पुढील सुनावणी २१ नोव्हेंबरला

विद्यार्थ्याने फी भरली नाही, म्हणून त्याला शाळेत बसू दिलं नसल्याचा प्रकार समोर आला आणि संतोष बांगर भडकले असल्याचं सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे बांगरे यांनी त्यात शिक्षीकेचं नेमकं काय म्हणणंय आहे, हे न ऐकताच त्यांची शाळा भरवली, असं बोललं जात आहे.  (Latest Marathi News)

असं बोललं जात आहे की, फी न भरल्याने परीक्षेला बसू दिलं नसल्याचे, विद्यार्थ्यांच्या पालकांनी याबाबत आमदार संतोष बांगर यांना सांगितलं. यानंतर त्यांनी संबंधित शाळेतील व्यवस्थापकांना फोन करून खडेबोल सुनावले, असं बोललं जात आहे.

Santosh Bangar Viral Audio Clip
Maratha Reservation: मोठी बातमी! मराठा आंदोलनाविरोधात गुणरत्न सदावर्तेंची हायकोर्टात याचिका, नेमकं काय म्हणणं मांडलंय?

बंडगर यांच्या कथित फोननंतर शाळा व्यवस्थापन प्रशासन टाळ्यावर आले असल्याचं सांगितलं जात आहे. आता या विद्यार्थ्याला परीक्षेसाठी बसू देण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी संदीप कुमार सोनटक्के यांनी दिली आहे. दरम्यान, या कथित व्हायरल ऑडिओ क्लिपची सत्यता आम्ही पडताळून पाहिलेली नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com