Bihar Viral Video
Bihar Viral VideoSaamtv

Viral Video: दारु जिंकली, माणुसकी हरली, कारच्या अपघातानंतर लोकांनी मदतीऐवजी पळवल्या दारुच्या बाटल्या; संतापजनक VIDEO

Bihar Viral Video: अपघात झाल्यानंतर स्थानिकांनी ड्रायव्हरला वाचवण्याऐवजी गाडीमधील दारु पळवून नेल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.
Published on

Bihar Viral Video:

बिहार राज्यात दारुबंदी आहे. तरीही बेकायदेशीरपणे दारु विक्री केल्याच्या अनेक घटना बिहारमध्ये समोर येत असतात. त्यामुळे ही दारुबंदी फक्त कागदावरच आहे की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. सध्या बिहारमधील अशाच एका व्हिडिओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. एका कारचा अपघात झाल्यानंतर स्थानिकांनी ड्रायव्हरला वाचवण्याऐवजी गाडीमधील दारु पळवून नेल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. लोकांच्या या कृतीवरुन नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

संपूर्ण दारूबंदी असलेल्या बिहारमध्ये (Bihar) विषारी दारू आणि दारूची तस्करी यामुळे मृत्यू झाल्याच्या अनेक बातम्या समोर येत असतात. गेल्या सोमवारी (३० ऑक्टोबर) सिवानमधून दारू लुटल्याचा व्हिडिओ समोर आला होता आणि आता गयामध्येही असाच काहीसा प्रकार घडला आहे. ज्यामध्ये लोकांच्या कृतीवर सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

गयामधील डोभी-चतरा रस्त्यावरील चतरा वळणावर सोमवारी (३० ऑक्टोबर) सायंकाळी एक दुर्घटना घडली. विदेशी दारूने भरलेल्या कारला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने भीषण अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी धाव घेतली खरी, पण लोकांनी जखमींना मदत करण्याऐवजी गाडीतील दारु पळवून न्यायला सुरूवात केली.

अपघातातग्रस्त कारचा ड्रायव्हर कसा आहे? कोणाला किती गंभीर दुखापत झाली याची साधी कोणी विचारपूसही करत नसल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. दारुपुढे कोणाच्या जिवाचीही पर्वा या लोकांना नाही का? असा सवाल काही युजर्सनी विचारला आहे, तर आणखी एकाने दारुबंदीमुळे लोक दारु पिणे बंद करत नाहीत हे स्पष्ट झाल्याचेही म्हणले आहे. (Latest Marathi News)

Bihar Viral Video
Rasta Roko Andolan : आमदार शंकरराव गडाखांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतक-यांनी अहमदनगर संभाजीनगर महामार्ग राेखला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com