एक मोठी बातमी समोर आली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून उपोषणाला बसलेले मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपलं उपोषण मागं घेतलं आहे. राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने भेट घेतल्यानंतर जरांगे यांनी आपलं उपोषण मागे घेतलं आहे. जरांगे यांनी सरकारच्या शिष्टमंडळाच्या हस्ते साखपणी घेत उपोषण मागे घेतलं आहे.
या शिष्टमंडळात मंत्री उदय सामंत, धनंजय मुंडे यांच्यसह इतर महत्वाच्या नेत्यांचाही समवेश होता. जरांगे यांनी सरकारला आरक्षण देण्यासाठी आणखी मुद्दत दिली आहे. मात्र त्यांनी एकच अट ठेवली आहे की, 'मराठ्यांना सरसकट आरक्षण द्या.' तसेच सर्व आंदोलन आता बंद करा, असं आवाहन जरांगे यांनी राज्यभरातील मराठा आंदोलकांना केलं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
'वेळ घ्या, मात्र आरक्षण द्या'
राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगे यांना आरक्षण देण्यासाठी दोन महिन्यांचा वेळ मागितला. मात्र मनोज जरांगे पाटील हे 24 डिसेंबरपर्यंत वेळ देण्यास ठाम होते. यानंतर सरकारी शिष्टमंडळाने विनंती केल्यानंतर त्यांनी आरक्षण देण्यासाठी 2 जानेवारीपर्यंत सरकारला वेळ दिली आहे. यावेळी बोलताना जरांगे म्हणाले आहेत की, 'वेळ घ्या, मात्र आरक्षण द्या.' (Latest Marathi News)
आपल्याला लढाई जिंकायची आहे, ती जिकणार. मी मराठ्यांचा अपमान होऊ देणार नाही. सरकारला वेळ द्यायची का, असं त्यांनी यावेळी आंदोलकांना विचारलं. यानंतर उपस्थित सर्व आंदोलकांनी एक सुरत याला होणार दिला. यानंतर आपण आंदोलन स्थगित करत असल्याचं जरांगे म्हणाले.
दरम्यान, उपोषण मागे घेतल्यानंतर मनोज जरांगे पाटील हे उपचार घेण्यासाठी रुग्णालयात दाखल होणार आहेत. याबाबत त्यांनी स्वतःच माहिती दिली आहे. त्यांनी उपोषण मागे घेतलं असलं तरी सकाळी उपोषण सुरूच राहणार, तसेच आरक्षण मिळाल्यानंतरच घरी जाणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.