Mantralaya mumbai News SAAM TV
मुंबई/पुणे

Mantralaya News: मंत्रालयात खळबळ, बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन आल्यानंतर उडाला गोंधळ

Mumbai Police: सध्या पोलिसांकडून मंत्रालय परिसर आणि इमारतीमध्ये तपासणी सुरु आहे.

Priya More

Mumbai News: मंत्रालयामध्ये (Mantralaya) बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. गेल्या १५ दिवसांत दुसऱ्यांदा मंत्रालय उडवून देण्याबाबतचा धमकीचा फोन आला आहे. या धमकीच्या फोननंतर मंत्रालयामध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. सध्या पोलिसांकडून (Mumbai Police) मंत्रालय परिसर आणि इमारतीमध्ये तपासणी सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज पुन्हा मंत्रालयात बॅाम्ब ठेवल्याचा निनावी फोन आला. या फोननंतर मंत्रालयच्या बाहेर सुरक्षा वाढविण्यात आली आहे. डॉग स्क्वॅयड आणि बॉम्ब शोध पथक मंत्रालय परिसरात तपासणी करत आहेत. मंत्रालयात येणाऱ्या गाड्यांची सखोल तपासणी केली जात आहे.

फोन करणाऱ्या व्यक्तीचे नाव आणि त्याच्या ठिकाणाची माहिती देखील समोर आली आहे. बाळकृष्ण ढाकणे असं या धमकी देणाऱ्या व्यक्तीचे नाव असून तो अहमदनगर येथे राहणारा आहे. या धमकीच्या फोननंतर मंत्रालयाच्या संपूर्ण परिसराची आणि इमारतीची तपासणी करण्यात आली पण बॉम्ब कुठेच नसल्याची पोलिसांची खात्री केली. कुठल्याही कर्मचारी अधिकाऱ्यांनी घाबरुन जावू नये अशा सूचना पोलिसांनी दिल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Explainer : सोन्याचा भाव 1,21000 रुपयांवर पोहोचला, काय आहे तेजीचं कारण? जाणून घ्या

Maharashtra Live News Update : आनंदाची शिधा योजना बंद करू नका, महिलांची सरकारकडे मागणी

ठाकरी बाणा, धारधार विधानं! प्रबोधनकार ठाकरेंच्या "त्या" पुस्तकात नेमकं आहे तरी काय? VIDEO

मराठवाड्यात मोठा राजकीय भूकंप, अजित पवार अन् शिवसेनेला धक्का, भाजपची ताकद वाढली

Piles pain relief: आता 5 मिनिटांत पाईल्सच्या वेदनांपासून होईल मुक्तता; डॉक्टरांनी सांगितला एक उत्तम आणि सोपा उपाय

SCROLL FOR NEXT