स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या मतदानानंतर निकाल २१ डिसेंबरला लागणार
संगणक शास्त्रज्ञ माधव देशपांडेंनी ईव्हीएममधील तांत्रिक अडचणींबाबत डेमो दाखवला
ईव्हीएमला कागदी लॉक का लावले जाताहेत आणि त्याला इलेक्ट्रॉनिक लॉक का नाही, यावर त्यांनी प्रश्न उपस्थित केला
पुणे : राज्यातील नगरपरिषदांचे आज मतदान आहे. पण याचा निकाल थेट २१ डिसेंबर रोजी लागणार आहे. अनेकांना आता ईव्हीएममधील मतांचं काय होणार, या ईव्हीएम सुरक्षित राहतील ना, त्यात काही फेरफार होणार नाही ना असा प्रश्न उपस्थितीत झाला असेलच. आता तुमची मतं या ई वी एम मध्येच राहणार आहेत पण ते कसे राहतात त्यातील तांत्रिक अडचणी काय आहेत हे पण समजून घ्या. कारण या मशीन बाबत आजवर अनेक चर्चा तुम्ही पाहिल्या असतील. ईव्हीएममध्ये असलेल्या अडचणी आणि त्यात बदल केला तर काय फायदा होऊ शकतो, याबाबत संगणक शास्त्रज्ञ माधव देशपांडे यांनी थेट डेमो दाखवला आहे.
माधव देशपांडे यांच्या म्हणण्यानुसार, "आज मतदान घेतली आहेत तर निकाल यायला २० दिवस लागणे म्हणजे हा सगळ्याच यंत्रणांचा खेळखंडोबा झाला आहे. पुढील २० दिवस ई वी एम मधील जनतेची मतं त्यातच राहतात पण ती तशीच राहतात का हे मला माहिती नाही'.
'या मशीनला सगळा बॅकअप आणि बॅटरी आहे. त्याबद्दल मुळात शंका नाही, पण आज आपण सगळं डिजिटल केलं आहे, असं म्हणत असताना मतपेटीला मात्र कागदाचे लॉक का लावतो? आपल्याकडे जगात सगळीकडे इलेक्ट्रॉनिक लॉकची सुविधा उपलब्ध असताना सुद्धा किमान जे मतं दिली आहे, तिला इलेक्ट्रॉनिक लॉक का नाही, असा प्रश्न या निमित्ताने देशपांडे यांनी उपस्थित केला.
तसंच, ईव्हीएममध्ये आज ही कंट्रोल युनिटला दिलेल्या कमांड बदलल्या जाऊ शकतात, याचा एक डेमोसुद्धा यावेळी देशपांडे यांनी त्यांच्या लॅपटॉपवर दाखवला. त्याबरोबर या मशीनमध्ये एक "चेकसम" सुद्धा नाही. विशिष्ट अल्गोरिदम वापरून तयार केलेली ही प्रणाली म्हणजे डेटाची अखंडता तपासण्यासाठी वापरली जाणारी एक संख्या किंवा मूल्य आहे. हे सुनिश्चित करते की ईव्हीएममध्ये स्टोअर केलेला डेटा बदलला, तर नाही किंवा या मशीन मधील डेटाचा (मतं) फेरफार झाला नाही. हे चेकसम कसं चालतं, याचा डेमो देशपांडे यांनी दाखवला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.