Sanjay Raut  saam tv
मुंबई/पुणे

Sanjay Raut : एकनाथ शिंदे भविष्यात देवेंद्र फडणवीसांनाही फोडणार, संजय राऊतांचा धक्कादायक आरोप

Maharashtra Politics: संजय राऊत यांच्या वक्तव्यांमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. उद्धव ठाकरे पाच लोकसभा मतदारसंघांचा तीन दिवसांचा दौरा करणार असून पक्ष संघटन मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे. शिंदे गटावर गंभीर आरोपही करण्यात आले आहेत.

Surabhi Jayashree Jagdish

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापलंय. उद्धव ठाकरे आगामी काळात पाच लोकसभा मतदारसंघांमध्ये तीन दिवसांचा दौरा करणार आहेत. या दौऱ्याचा उद्देश संघटनात्मक आढावा घेणं, स्थानिक परिस्थिती समजून घेणं आणि शिवसैनिकांशी थेट संवाद साधणं असल्याचं राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

पाच लोकसभा मतदारसंघांमध्ये उद्धव ठाकरेंचा दौरा

संजय राऊत यांच्या सांगितलं की, उद्धव ठाकरे तीन दिवसांत पाच लोकसभा मतदारसंघांचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात ते प्रत्येक ठिकाणी जाऊन स्थानिक राजकीय स्थितीचा सखोल आढावा घेणार आहेत तसंच पक्ष संघटनेची ताकद तपासणार आहेत.

या भेटींमध्ये निष्ठावंत शिवसैनिकांशी थेट संवाद साधला जाणार असल्याचंही त्यांनी सांगितले. ज्या मतदारसंघांमध्ये काही खासदारांवर पक्षविरोधी भूमिका घेतल्याचं आरोप आहेत त्या ठिकाणी अजूनही शिवसेनेची संघटनात्मक ताकद मजबूत असल्याचा दावा राऊत यांनी केलाय. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्या भागात संबंधित खासदारांसोबत एकही शिवसैनिक गेलेला नाही, त्यामुळे कार्यकर्त्यांची निष्ठा अबाधित असल्याचं चित्र दिसतं.

आमदार आणि पक्षफुटीच्या आरोपांवर राऊतांची भूमिका

पक्षफुटीच्या मुद्द्यावर भाष्य करताना राऊत यांनी आमदारांच्या संख्येचा उल्लेख करत कठोर भूमिका मांडली. त्यांच्या म्हणण्यानुसार, १२ असोत किंवा २२ आमदार, पक्षविरोधी हालचाली करणाऱ्यांना कोणतीही सूट दिली जाणार नाही.

पक्ष फोडण्याचे प्रयत्न पूर्वीही झाले असून ते अजूनही सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. या सर्व घडामोडींना पक्ष संघटन मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून उत्तर दिलं जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. भविष्यात अशा राजकीय हालचाली आणखी तीव्र होण्याची शक्यता असल्याचेही राऊत यांनी नमूद केले.

शिंदे गटावर आरोप

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही राऊत यांनी तीव्र टीका केली. त्यांच्या म्हणण्यानुसार भविष्यात शिंदे हे देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनाही राजकीयदृष्ट्या अडचणीत आणण्याचा प्रयत्न करू शकतात. कारण ते त्यांना ही फोडण्याचा प्रयत्न करू शकतात. तसंच पुढे अमित शहा यांच्याविरोधातही काही राजकीय हालचाली होऊ शकतात, असं विधान त्यांनी केलंय.

‘ऑपरेशन टायगर 3’वर स्पष्टीकरण

‘ऑपरेशन टायगर 3’ या नावाने काही माध्यमांमध्ये चुकीची माहिती पसरवली जात असल्याचा आरोप राऊत यांनी केला. त्यांच्या मते, ही केवळ संभ्रम निर्माण करणारी राजकीय मोहीम आहे. त्यांनी असा दावा केला की, “सहा गद्दार फुटले” हीच खरी परिस्थिती आहे. या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण अधिकच तापले असून दोन्ही बाजूंनी प्रतिक्रिया उमटत आहेत.

राम मंदिर देणगीवर प्रश्न

राम मंदिरासाठी दिलेल्या देणगीबाबतही राऊत यांनी प्रश्न उपस्थित केलं. देणगीच्या रकमेचा स्पष्ट हिशोब उपलब्ध नाही. तसंच निधीचा वापर नेमका कुठे झाला याबाबत पारदर्शकता नसल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांच्या म्हणण्यानुसार काही निधी निवडणूक खर्च किंवा राजकीय पक्षफुटीसाठी वापरला गेला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे. स्वतः दिलेल्या देणगीची अधिकृत पावती मिळाली नसल्याचेही त्यांनी नमूद केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बळीराजाच्या सुख-समृद्धीसाठी डोंबिवलीत पार पडला नवकुंडात्मक सहस्रचंडी महायाग

Rajma vs Chole: राजमा की छोले, सर्वाधिक प्रोटिन कशात? उत्तर वाचून आश्चर्यचकित व्हाल

शेतजमीन खरेदीचा प्लॅन आहे का? ५ महत्त्वाचे डॉक्युमेंट्सच तपासाच; अन्यथा आयुष्यभराची कमाई बुडणार

high fiber superfoods : पोट निरोगी ठेवण्यासाठी फायदेशीर आहेत हे 7 फायबरयुक्त सुपरफूड्स

Upvasachi Batata Bhaji Recipe : नवरात्रीच्या उपवासाला बनवा दाण्याच्या कुटाची बटाट्याची भाजी, चव इतकी भन्नाट की पुन्हा पुन्हा खाल

SCROLL FOR NEXT