Khandeshwar Tourism : 'खांदेश्वर'जवळील 'ही' सुंदर पर्यटन स्थळे एकदा फिरा, पावसाळ्यात निसर्गाच्या प्रेमात पडाल

Shreya Maskar

गाडेश्वर धरण

खांदेश्वरपासून सुमारे ९ किमी अंतरावर मालडुंगे जवळ गाडेश्वर धरण आहे. हे शांत मातीचे धरण हिरव्यागार टेकड्यांनी आणि विस्तीर्ण जलाशयाने वेढलेले आहे. पक्षीनिरीक्षण आणि निवांत वेळ घालवण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे.

Gadeshwar Dam | google

कर्नाळा पक्षी अभयारण्य

कर्नाळा पक्षी अभयारण्य पावसाळ्यात खुलते. वन डे ट्रिपसाठी हे बेस्ट लोकेश आहे. विविध पक्षी-प्राणी येथे पाहायला मिळतात.

Karnala Bird Sanctuary | google

पांडवकडा धबधबा

तुम्हाला जर पावसाळ्यात धबधब्याखाली भिजायचे असेल तर पांडवकडा धबधब्याला नक्की भेट द्या. येथे इंद्रधनुष्याचा सुंदर नजारा पाहायला मिळतो.

Pandavkada Falls | google

अडाई धबधबा

खांदेश्वरपासून सुमारे ५ किमी अंतरावर अडाई गावात अडाई धबधबा आहे. पावसाळ्यात पाण्यात खेळण्याचा आनंद घेण्यासाठी येथे अनेक पर्यटक येतात.

Adai Falls | google

बल्लाळेश्वर वॉटरफ्रंट

खांदेश्वरपासून सुमारे २.५ किमी अंतरावर बल्लाळेश्वर वॉटरफ्रंट आहे. हा स्वच्छ सरोवराकाठचा परिसर आहे; येथे चालण्यासाठी पक्के मार्ग आणि पाण्यालगत बसण्यासाठी शांत जागा उपलब्ध आहेत.

Ballaleswar Waterfront | google

खारघर टेकड्या

खारघर टेकड्या हे ट्रेकिंगसाठी बेस्ट ठिकाण आहे. येथे सुंदर हिरवाईने नटलेल्या टेकड्या पाहायला मिळतात. फोटोशूटचा भन्नाट आनंद येथे घेता येईल.

Kharghar Hills | google

खांदेश्वर तलाव

खांदेश्वर तलाव हे ऐतिहासिक ठिकाण आहे. या तलावाच्या बाजूला जुने आणि लोकप्रिय श्री खांदेश्वर महादेव मंदिर आहे, जिथे महाशिवरात्रीला मोठी जत्रा भरते आणि हजारो भाविक येतात.

Khandeshwar Lake | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | google

NEXT : पावसाळ्यात स्वर्गाहून सुंदर दिसतात 'ही' ठिकाणे, ऑगस्टमध्ये प्लान करा ट्रिप

Monsoon Destinations | AI PHOTO
येथे क्लिक करा...