eknath shinde news  Saam tv
मुंबई/पुणे

कल्याण-डोंबिवलीची वाहतूक कोंडी सुटणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली महत्त्वाची माहिती

eknath shinde latest speech : कल्याण-डोंबिवलीची वाहतूक कोंडीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठं भाष्य केलं. ते कल्याणमध्ये बोलत होते.

Vishal Gangurde

एकनाथ शिंदेंची MCHI प्रॉपर्टी प्रदर्शनास हजेरी

शिंदेंची हेलिकॉप्टरने कल्याणमध्ये एन्ट्री

कल्याण-डोंबिवलीच्या वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्र्यांचं मोठं विधान

कल्याणच्या फडके मैदानात आज रविवारी राजकीय आणि विकासाच्या गप्पांचा धुराळा उडाला. MCHI प्रॉपर्टी प्रदर्शनात उपमुख्यंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली. या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट हेलिकॉप्टरने धावती भेट दिली. एकनाथ शिंदेंनी मेट्रो, समृद्धी महामार्ग, काळू धरण आणि लाडक्या बहिणी योजनेवरून मोठं भाष्य केलं.

एकनाथ शिंदे म्हणाले, 'मी आज माणगाव-महाडमध्ये होतो. तिथून हेलिकॉप्टरने थेट ठाण्याला उतरणार होतो. पण मी तुम्हाला शब्द दिला होता. पायलटने सांगितले की, २० मिनिटे लागतील, मी थेट कल्याणला उतरलो. मी जे कमिट करतो ते पाळतो, तिथे मी स्वतःचही ऐकत नाही'.

कल्याण-डोंबिवलीच्या वाहतूक कोंडीवरही शिंदेंनी महत्वाचं भाष्य केलं. मेट्रो ५ (ठाणे-भिवंडी-कल्याण-उल्हासनगर) च्या डिझाइनमध्ये बदल केल्याचे शिंदेंनी सांगितले. भिवंडी रांजणोली ते थेट महापे या मेट्रोमुळे कल्याण-डोंबिवलीची वाहतूक कोंडी कायमची संपेल. त्याचबरोबर आमने जवळून जाणारा रस्ता समृद्धी महामार्गाला जोडून कल्याणला मोठी कनेक्टिव्हिटी देणार आहोत," अशी माहिती उपमुख्यमंत्र्यांनी दिली.

​पाणी प्रश्न आणि काळू धरणावर शिंदे काय म्हणाले?

कल्याणच्या पाणीटंचाईवर तोडगा म्हणून 'काळू धरण' बांधले जात आहे. MMRDA ने ४५० कोटी रुपये भरलेत. त्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या धरणावर शिंदे म्हणाले, "MCHI ने रस्ते बनवायला घ्यावे, आम्ही २ FSI देऊ, यात लोकांचाही फायदा होईल'.

'रिअल इस्टेट हे शेतीनंतर दुसऱ्या क्रमांकाचे रोजगार देणारे क्षेत्र आहे. कोविड काळात विकासक व्हेंटिलेटरवर होते. तेव्हा आम्ही प्रीमियम आणि स्टॅम्प ड्युटीमध्ये सवलत दिली. ​ठाण्याला जे विकासाचे निकष लावले आहेत. तेच कल्याण-डोंबिवलीला लागू करण्यासाठी लवकरच जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहे, असं शिंदे यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss Marathi 6 Grand Finale : शेवटच्या क्षणी बाजी पलटली; 'बिग बॉस मराठी 6'चा स्ट्राँग स्पर्धक घराबाहेर, नाव वाचून बसेल धक्का

Monday Horoscope : गोड गुलाबी संसारात मिठाचा खडा पडणार; ५ राशींच्या लोकांना घ्यावे लागणार काळजीपूर्वक निर्णय

Bigg Boss Marathi 6 Finale: 'घरी वहिनींचा धक्का...'; ‘बिग बॉस मराठी ६’ ग्रँड फिनालेमध्ये जिनिलिया आणि अभिषेक बच्चनची खास एन्ट्री

महिला बचत गटाच्या नावावर ५ लाखांची फसवणूक; बनावट सह्या अन् ...; |VIDEO

मित्रानेच खुपसला भारताच्या पाठीत खंजीर, भारतीय तेल टँकरवर इराणची फायरिंग

SCROLL FOR NEXT