मुंबई: राज्यात गेल्या काही दिवसापासून सुरू असलेले सत्तासंघर्षाला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार अडीच वर्षात कोसळले आहे. शिवसेनेचे (ShivSena) ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंड केल्याने महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले. शिवसेनेच्या बंड केलेल्या नेत्यांना कॅबिनेट मंत्री पदावर बढती मिळणार असल्याचे बोलले जात आहे.
एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंड केले होते. या बंडात महाविकास आघाडीमध्ये मंत्री असणारे नेत्यांनीही बंड केले होते, यात शिवसेना (ShivSena) नेते शंभूराजे देसाई यांनीही बंड केले होते. आणि अपक्ष असणारे राजेंद्र पाटील यड्रावकर यांनीही बंड केले होते. या दोन्ही मंत्र्यांना कॅबिनेटमध्ये बढती मिळणार असल्याचे बोलले जात आहे.
शिंदे (Eknath Shinde) गटातील नव्या चेहऱ्यांना मंत्री पदाची संधी मिळणार आहे. यात कोल्हापूरचे आमदार प्रकाश आबिटकर यांना आता मंत्री पदावर बढती मिळणार असल्याचे बोलले जात आहे. तर महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्रीपद असणाऱ्या आमदारांना कॅबिनेट पदावर बढती मिळणार असल्याचे बोलले जात आहे.
येत्या काही दिवसात शपथविधी होणार असल्याचे बोलले जात आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार गुवाहाटीवरुन गोव्यात आले आहेत, ते शपथविधी दिवशीच मुंबईत येणार असल्याचे बोलले जात आहे.
भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ या निवासस्थानी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक बोलावण्यात आली आहे. आज सकाळी ११ वाजता होणाऱ्या या बैठकीला महाराष्ट्र भाजपचे प्रभारी सीटी रवी हेही उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत सरकारच्या शपथविधी संबंधी चर्चा हेणार असल्याचे बोलले जात आहे. भाजपने आपल्या सर्व आमदारांना पुढील आदेश मिळेपर्यंत मुंबईतच राहण्यास सांगितले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.