MSRTC Employees News SAAM TV
मुंबई/पुणे

MSRTC Employees : एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; संप काळात मृत्यू झालेल्यांच्या वारसांना मिळणार नोकरी

संप काळात मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना आता नोकरी मिळणार आहे.

सूरज सावंत

मुंबई : एसटी संपकाळातील कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. संप काळात मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना आता नोकरी मिळणार आहे. राज्यातील परिवहन विभागाने हा निर्णय घेतला आहे. परिवहन विभागाच्या या निर्णयामुळे राज्यातील १२४ मृत एसटी कर्मचाऱ्यांच्या वारसदारांना नोकरी मिळणार आहे. (Latest Marathi News)

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत असताना राज्यातील एसटी (MSRTC) कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी संप पुकारला होता. जवळपास तीन महिने हा संप चालला होता. यादरम्यान, कर्मचाऱ्यांनी टोकाचं पाऊल उचललं होतं. संप काळात १२४ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता.

दरम्यान, ज्या कर्मचाऱ्यांचा संपकाळात मृत्यू झाला, आता त्यांच्या जागी वारसांना नोकरी देण्यात येणार आहे. या कर्मचाऱ्यांच्या वारसांना त्याच कर्मचाऱ्यांच्या जागेवरती नोकरी मिळणार आहे. विशेष म्हणजे या वारसांना सेवासलगतेचाही लाभ मिळणार आहे.  (Breaking Marathi News)

मार्च २०२२ मध्ये न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर येण्यास सुरुवात केली. संपकाळात पगाराविना आर्थिक संकटापुढे टिकाव न धरू शकलेल्या १२४ अधिक कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करत आपले जीवन संपवले होते.

या संपामुळे एसटी महामंडळाचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले होते. जवळपास चार महिने एसटी सेवा ठप्प होती. तरीही एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्याची मागणी मान्य झाली नव्हती. परंतु, सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात पाच हजार, चार हजार आणि अडीच हजार रुपयांची वाढ केली होती.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Municipal Elections Voting Live updates : माजी खासदार प्रकाश जावडेकर यांनी बजावला मतदानाचा अधिकार

यंदाच्या विकेंडला कोणता मुव्ही पाहाल? १२-१८ जानेवारीमध्ये ओटीटीवर काय होणार रिलीज पाहा

Nashik : मतदानाआधी शिंदेंच्या उमेदवारवर गुन्हा दाखल, अपहरण करतानाचा CCTV व्हायरल

Hot Yoga: झटक्यात वजन कमी करण्यासाठी करा हॉट योगा, एका आठवड्यात वितळेल शरीराची चरबी

Ladki Bahin Yojana: लाडकीच्या खात्यात डिसेंबरचा हप्ता जमा, या महिलांना ₹१५०० मिळालेच नाहीत; कारण काय?

SCROLL FOR NEXT