Mohsin Shaikh Case : पुण्यातील मोहसीन शेख हत्या प्रकरणात २० जणांची निर्दोष सुटका, काय आहे नेमके प्रकरण?

सोलापुरातील काही तरुणांनी 'जस्टिस फॉर मोहसीन' ही चळवळ देखील सुरू केली होती.
Mohsin Shaikh Case
Mohsin Shaikh Case SAAM TV
Published On

सचिन जाधव

Mohsin Shaikh Murder Case In Pune : पुण्यातील हडपसर येथील मोहसीन शेख हत्या प्रकरणात सत्र न्यायालयानं निकाल दिला आहे. या प्रकरणात हिंदू राष्ट्र सेनेचा धनंजय देसाई याच्यासह २० जणांनी सबळ पुराव्याअभावी न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली आहे. (Latest Marathi News)

पुण्यातील हडपसर परिसरातील मोहसीन शेख हत्या प्रकरणात सत्र न्यायालयाने हिंदू राष्ट्रसेनेच्या धनंजय देसाईसह २० जणांची निर्दोष मुक्तता केली. सबळ पुराव्याअभावी ही मुक्तता करण्यात आली आहे.

Mohsin Shaikh Case
Pune News : पुणे भयंकर घटनेनं हादरलं; पती-पत्नी आणि २ मुलांनी जीवनयात्रा संपवली, कारण आलं समोर

सन २०१४ मध्ये आक्षेपार्ह पोस्टमुळे पुण्यात तणाव निर्माण झाला होता. त्यावेळी आयटी क्षेत्रातील अभियंता असलेला मोहसीन शेखची हत्या करण्यात आली होती.

या प्रकरणी पोलिसांनी हिंदू राष्ट्रसेनेच्या धनंजय देसाईसह २३ जणांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले होते. सोलापुरातील काही तरुणांनी 'जस्टिस फॉर मोहसीन' ही चळवळ देखील सुरू केली होती.

Mohsin Shaikh Case
Gujarat News: उलट्या काळजाची... ३ महिन्यांच्या मुलीला तिसऱ्या मजल्यावरून फेकलं; तिचं काळीज चिरलं नाही का?

छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे काही आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर पोस्ट केल्यामुळे २ जून २०१४ मध्ये हडपसरमध्ये तणाव निर्माण झाला होता. त्यावेळी हिंदू राष्ट्रसेनेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली होती.

काही जणांनी मोहसीनला हटकलं आणि मारहाण केली होती. त्यात मोहसीनचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात २०१९ मध्ये धनंजय देसाईला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com