Ajit pawar devendra fadnavis eknath shinde Saam Tv
मुंबई/पुणे

Shinde-Fadnavis-Pawar Govt PC : शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, पावसाची चिंता आम्हालाही आहे; CM एकनाथ शिंदेंची ग्वाही

Political News : विरोधीपक्ष कितीही कमकूवत असला तरी त्यांना दुय्यम स्थान देणार नाही, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Mumbai News : विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी विरोधकांवर सडकून टीका केली. सरकारच्या चहापाणाला विरोधक नेहमीप्रमाणे आले नाहीत.

राज्यात पाऊस चांगला झालेला नाही. पावसाची चिंता आम्हालाही आहे. शेवटी निसर्ग आहे लहरीप्रमाणे अतिवृष्ठी गारपीठ होत आहे. मात्र हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभं आहे. शेतकऱ्यांवर वाऱ्यावर सोडणार नाही असा शब्दही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.

विरोधकांना दुय्यम स्थान देणार नाही- मुख्यमंत्री

दररोज सकाळी आपण दाखवता सरकार पडेल, मात्र ते काही पडलं नाही. आता आणखी मजबूत झालं आहे. सरकार म्हणून आता आमची जबाबदारी आहे, विरोधीपक्ष कितीही कमकूवत असला तरी त्यांना दुय्यम स्थान देणार नाही, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. (Latest Marathi News)

लोाकांच्या प्रश्नाला न्याय देण्याचा प्रयत्न- फडणवीस

अधिवेशनात जास्तीत जास्त चर्चा आम्ही करु. लोकांच्या प्रश्नाला न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला आहे. इलेक्शन कमिशनने देखील निकाल दिला आहे. तरीही हे सरकार बेकायदेशीर असल्याची विरोकांकडून होत आहे. विरोधक एकीकडे लोकशाहीच्या गप्पा मारतात आणि लोकशाहीच्या मंदिराने दिलेल्या निर्णयाला मानायचं नाही, असा टोलाही देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. (Political News)

विरोधकांना योग्य उत्तर देऊ- अजित पवार

अजित पवार यांनी म्हटलं की, सभागृहात सत्ताधारी पक्षाची उपस्थिती ठेवणे, आयुधांचा वापर करुन योग्य पद्धतीने काम करणार. लोकशाही आम्हाला माहीत आहे. सगळे प्रश्न सोडवण्याचा आमचा प्रयत्न आहे. पावसाच म्हणावं तसं प्रमाण नाही. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजाने पाऊस पडला तर बळीराजा समाधानी राहील. आम्ही विरोधकांना व्यवस्थितपणे उत्तर देण्याच काम करु. उत्तरात थातूर मातूर सांगण्याचं काम सत्ताधारी पक्षाकडून होणार नाही, असं त्यांनी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India-Pakistan Cricket: भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना होणार की नाही? क्रीडा मंत्रालयानं स्पष्टचं सांगितलं

Maharashtra Live News Update: तारापूर औद्योगिक वसाहतीमध्ये गॅस गळती

Voter Duplication: सत्ताधारी आमदाराच्या पत्नीचं मतदार यादीत दोनदा नाव|VIDEO

Ganeshotsav 2025: कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, गणेशभक्तांना टोलमाफी; पास कसा आणि कुठे मिळणार?

Pune Metro : पुणेकरांसाठी गुड न्यूज, मेट्रो प्रवास करत घ्या बाप्पाचं दर्शन; गणेशोत्सवानिमित्त नवं वेळापत्रक जारी

SCROLL FOR NEXT