Kalyan political News Saam tv
मुंबई/पुणे

Kalyan politics : निवडणुकीच्या तोंडावर राजकीय फटाके; शिंदे गटाच्या आमदाराचा भाजप नेत्यांना खोचक सल्ला, नेमकं काय म्हणाले?

Kalyan political News : ऐन निवडणुकीच्या तोंडावर कल्याण-डोंबिवलीत राजकीय फटाके वाजायला सुरुवात झाली आहे. शिंदे गटाच्या आमदाराने भाजप नेत्यांना खोचक सल्ला दिला. नेमकं काय म्हणाले, वाचा सविस्तर

Saam Tv

निवडणुकीच्या तोंडावर राजकारण तापलं

कल्याणमधील शिंदे गटाच्या आमदाराचा भाजप दिला खोचक सल्ला

आमदार राजेश मोरेंच्या भाजपला फोडाफोडीसाठी शुभेच्छा

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

कल्याण–डोंबिवली आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकारण तापलं असतानाच शिवसेनेच्या वरिष्ठ आमदारांनी भाजप नेत्यांना थेट सल्ला देत वातावरण अधिकच रंगतदार केलं आहे. आपलं घर सोडून दुसऱ्याच्या घरात गेलेल्यांना लाख लाख शुभेच्छा फोडाफोडीची सुरुवात त्यांनीच केली. एक नंबर असलेला पक्ष अशा प्रकारच्या फोडाफोडीच्या राजकारणात पडू नये,असा टोला आमदारांनी लगावला.

भाजपने आज शिंदे गटातील तीन महत्वाच्या माजी नगरसेवकांना आपल्या गोटात घेतल्याच्या पार्श्वभूमीवर हा सल्ला देण्यात आला असल्याचे बोलले जाते. याचदरम्यान त्यांनी शिवसेनेची कल्याण–डोंबिवलीतील वास्तविक ताकद अधोरेखित करत शिवसेना ही इथली मुळाशी घट्ट रोवलेली शक्ती आहे. तळागाळात आमचा मजबूत पाया आहे. फोडाफोडीने काहीच फरक पडणार नाही,असे स्पष्ट केले.

राजकीय नेत्यांच्या जाण्या–येण्याकडे फारसा भाव न देता, सत्ता आणि पदासाठी घर बदलणाऱ्या नेत्यांना त्यांनी अप्रत्यक्षपणे सुनावले. शहरातील मतदारांनी विचारपूर्वक निर्णय घेत असल्याने अशा हालचालींचा फारसा परिणाम होत नसल्याचेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, या वक्तव्यामुळे शहरात नव्या चर्चांना उधाण आले असून भाजप–शिवसेना शिंदे गट यांच्यातील आगामी राजकीय लढतीचा रंग आणखी गडद होताना दिसत आहे.

भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्याचा शिंदे गटावर आरोप

कल्याण-डोंबिवलीतील राजकीय वातावरणात खळबळ उडवणारा आरोप समोर आलाय. मोक्काचा आरोपी कुणाल पाटील याला आमच्या पक्षातीलच लोक पाठीशी घालत आहेत. मी दोन दिवसांपासून प्रचंड दडपणाखाली होतो,असा थरारक खुलासा महेश पाटील यांनी केलाय. शिंदे गटाच्या दडपणामुळे आज भाजपमध्ये प्रवेश केल्याची घोषणा महेश पाटील यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandara Accident: भीषण अपघातामध्ये उपसरपंचाचा मृत्यू, कारने दुचाकीला चिरडलं नंतर...

Kalyan Dombivli Water : कल्याण डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी! २ जून रोजी १२ तास पाणी पुरवठा राहणार बंद

आधारकार्डधारकांना मोफत इलेक्ट्रिक सायकल? इलेक्ट्रिक सायकलसंदर्भात मोदींची घोषणा?

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

SCROLL FOR NEXT