ed mumbai office  Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Crime News : ईडीची मोठी कारवाई; ED कार्यालयात काम करणाऱ्या 2 कर्मचाऱ्यांना अटक, काय आहे प्रकरण?

मुंबईतून ईडी कारवाईचं मोठं वृत्त हाती आलं आहे. ईडी कार्यालयात काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.

सूरज सावंत

Mumbai News : मुंबईतून ईडी कारवाईचं मोठं वृत्त हाती आलं आहे. ईडी कार्यालयात काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. ईडीनेच ही कारवाई केली आहे. ईडीच्या या कारवाईनंतर प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

ईडीने मुंबईमधील ईडी (ED) कार्यालयात काम करणाऱ्या दोन ऑफिसबॉयना अटक करण्यात आली आहे. ईडीच्या तपासाची गोपनीय कागदपत्रे बाहेर उघड केल्याचा दोघांवर आरोप आहे. पुण्यातील व्यावसायिक अमर मुलचंदानी यांना काही गोपनीय कागदपत्र विकल्याचा चौकशीत समोर आलं आहे.

पिंपरी चिंचवडमधील सेवा विकास कॉ-ऑपरेटिव्ह बँकेचे संचालक अमर मुलचंदानी हे मनी लॉड्रिंगच्या गुन्ह्यात आरोपी आहेत. अमर मुलचंदानी यांच्या ड्रायव्हरच्या संपर्कात ईडीच्या कार्यालयातील दोन कर्मचारी होते.

या कर्मचाऱ्यांनी कार्यालयातील गोपनीय माहिती मुलचंदानी यांच्या ड्रायव्हरला पुरवली असल्याचं समोर आल आहे. ईडीने कार्यालयातीलच दोन कर्मचारी आणि मूलचंदानी यांच्या ड्रायव्हरला अटक केली आहे.

कोण आहे अमर मुलचंदानी ?

पिंपरी चिंचवडमधील (Pimpri-Chinchwad) सेवा विकास को ऑपरेटीव्ह बँकेचे माजी अध्यक्ष अमर मुलचंदानी आहेत. त्यांच्यावर बँकेतील २३८ कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे.

पिंपरी कँपातील सिंधी व्यापाऱ्यांची बँक म्हणून सेवा विकास बँक ओळखली जाते. या बँकेच्या शहराबाहेरही शाखा आहेत. तिचे मूलचंदानी हे गेली दहा वर्षे अध्यक्ष होते. जानेवारी महिन्यात त्यांनी राजीनामा दिला आहे. तसेच त्यांचे स्थानिक राजकीय नेत्यांशी संबंध आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : धक्कदायक! भर लग्नमंडपात नवरदेवावर हल्ला, बोहल्यावर चढणार इतक्यात...

Google Doodle Equation: गुगल डुडलवर आज गणिताची समीकरणं; जाणून घ्या काय आहे भन्नाट प्रकार

Kids Tea Drinking Risks : लहान मुलांना चहा देत असाल तर सावधान! हे दुष्परिणाम वाचा

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र ATS ची पुण्यात छापेमारी

Pune Metro : पुणेकरांचा नेम नाही, मेट्रोमध्ये केले प्री वेडिंग शूट, नंतर...

SCROLL FOR NEXT