UP Crime News: प्रियकराचा अपघाती मृत्यू, विरहातून प्रेयसीनेही घेतला जगाचा निरोप; मन सुन्न करणारी घटना

Girlfriend Boyfriend Love Story: मिळालेल्या माहितीनुसार, सुनिताचे आपल्याच नातेवाईकातील कुलदीप नावाचा एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते.
Uttar Pradesh Girlfriend boyfriend Love Story
Uttar Pradesh Girlfriend boyfriend Love Story Saam TV

Uttar Pradesh News : जीवापाड प्रेम करत असलेल्या प्रियकराचं अचानक एका रस्ता अपघातात दुर्देवी निधन झालं. या घटनेनं प्रेयसीला मोठा धक्का बसला. तिने जेवण-पाणी सोडलं. ती कोणाशीच बोलत नव्हती. तसेच कायम मौन बाळगलेल्या अवस्थेत असायची. अखेर प्रियकराचा विरह सहन न झाल्याने तिने टोकाचं पाऊल उचललं. (Breaking Marathi News)

प्रेयसीने काळीज पिळवटून टाकणारी (Crime News)  सुसाईड नोट लिहून ठेवली आणि आपल्या राहत्या घरी गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. अंगावर काटा आणणारी ही दुर्देवी घटना उत्तरप्रदेशातील रायबरेली जिल्ह्यात घडली. या घटनेनं मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

Uttar Pradesh Girlfriend boyfriend Love Story
Virar Crime News : प्रियकराला झाडाला बांधून १९ वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार; विरारमधील संतापजनक घटना

सुनिता (वय २३ वर्ष) असं आत्महत्या केलेल्या तरुणीचं नाव आहे. गुरूवारी सुनिताचा मृतदेह तिच्या राहत्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. सुनीताच्या आत्महत्येची बातमी कळताच परिसरात एकच खळबळ माजली. (Latest Marathi News)

सुनिताने आत्महत्या केली तेव्हा कुटुंबीय शेतात कामाला गेले होते. घराच्या आजूबाजूला खेळणाऱ्या मुलांनी सुनीताला फासावर लटकलेले पाहिल्यानंतर ही माहिती कुटुंबीयांपर्यंत पोहोचली. घटनेची माहिती मिळताच पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सुनिताचा मृतदेह ताब्यात घेतला.

Uttar Pradesh Girlfriend boyfriend Love Story
High Court Decision : पत्नीने पती आणि सासरच्या मंडळींचा आदर न करणे ही क्रूरता; न्यायालयाचे महत्वपूर्ण निरीक्षण

होळीच्या दिवशी प्रियकराचा झाला होता मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, सुनिताचे आपल्याच नातेवाईकातील कुलदीप नावाचा एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. गेल्या अनेक दिवसांपासून सुनिता आणि कुलदीपचा एकमेकांवर जीव जडला होता. सुनीताच्या मैत्रीणीने दिलेल्या माहितीनुसार, दोघेही लवकरच लग्न करणार होते.

मात्र, दोघांचं हे प्रेम नियतीला मान्य नव्हतं. होळीच्या दिवशी म्हणजेच ८ मार्च रोजी कुलदीप हा दुचाकीवरून जात असताना त्याचा अपघात झाला. या अपघातात कुलदीपचा दुर्देवी मृत्यू झाला. कुलदीपच्या निधनाची बातमी कळताच सुनीताला मोठा धक्का बसला.

Uttar Pradesh Girlfriend boyfriend Love Story
Crime News: भयंकर! पती- पत्नीने विहिरीत उडी मारुन संपवले जीवन; धक्कादायक घटनेने जुन्नर तालुक्यात खळबळ

गेल्या १५ दिवसांपासून ती कुणासोबतही बोलत नव्हती. नेहमी एकटं राहणंच पसंत करत होती. याशिवाय तिचे जेवणाकडे सुद्धा लक्ष नव्हते. अखेर कुलदीपच्या निधनानंतर सुनीताने सुद्धा हे जग सोडण्याचा निर्णय घेतला. गुरूवारी तिचे कुटुंबीय शेतात गेले असता, तिने राहत्या घरी गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली.

सुनीताच्या आत्महत्येची बातमी कळताच परिसरात एकच खळबळ माजली. घराच्या आजूबाजूला खेळणाऱ्या मुलांनी सुनीताला फासावर लटकलेले पाहिल्यानंतर ही माहिती कुटुंबीयांपर्यंत पोहोचली.दरम्यान, नातेवाईकांनी सुनीताला खाली उतरवले आणि जवळच्या रूग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. मुलीच्या मृत्यूनंतर आईने एकच टाहो फोडला.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com