Mumbai Crime News : थरारक! सख्खा शेजारी बनला पक्का वैरी, चाकू हल्ला करत तिघांना संपवलं, धक्कादायक कारण आलं समोर

Mumbai News : सदर घटनेत एकूण ५ जण गंभीर जखमी झाले.
Mumbai News
Mumbai News Saam TV

सचिन गाड

Mumbai News :  मुंबईतील वर्दळीच्या ग्रँट रोड भागात थरारक घटना घडली आहे. शेजाऱ्याने आजूबाजूला राहणाऱ्या पाच जणांवर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात तिघांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

डॉ.दा.भ.मार्ग पोलीस ठाणेच्या हद्यीत पार्वती मेन्शन बिल्डिंगमध्ये आरोपी चेतन गाला (वय ५४ वर्ष) याने आज दुपारी ३.३० वाजण्याचे सुमारास हातातील चाकूने शेजारी राहणाऱ्या लोकांवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. सदर घटनेत एकूण ५ जण गंभीर जखमी झाले. सगळी घटना होत असताना खाली बघ्यांची गर्दी जमली होती आणि त्यांनी सगळी घटना मोबाईल कॅमेरामध्ये शूट केली. (Latest News Update)

Mumbai News
Mumbai Fire news: मुंबईच्या चुनाभट्टीत इमारतीला भीषण आग; 2 कर्मचारी अडकल्याची शक्यता, अग्निशामक दल घटनास्थळी दाखल

चेतन गालाने घरातून बाहेर पडताच शेजारी जयेंद्र मिस्त्री आणि त्यांची पत्नी इला यांच्यावर चाकूने वार केले. चेतनने बाल्कनीत झोपलेल्या प्रकाश वाघमारे, जो इमारतीत काम करायचा त्याच्यावरही हल्ला केला. त्यानंतर खाली राहणाऱ्या स्नेहल ब्राम्हभट्ट आणि त्यांची मुलगी जेनिल यांना देखील चेतनने जखमी केलं.

Mumbai News
Rahul Gandhi Tweet: खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले?

मिळालेल्या माहितीनुसार, दीड महिन्यापूर्वी चेतन गालाची बायको २ मुली आणि मुलला घेऊन माहेरी निघून गेली होती. शेजाऱ्यांनी बायकोचं डोकं भडकवल्याचा चेतनला संशय होता. तर सततच्या भांडणाना कंटाळून घर सोडल्याचा बायकोचं म्हणणं होतं.

जखमींना एच.एन. रिलायन्स हॉस्पिटल आणि नायर रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस पुढील तपास सुरु आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com