Matoshree Saam Tv
मुंबई/पुणे

Matoshree : मातोश्रीवर नजर ठेवली जातेय, ठाकरेंच्या नेत्यांचा गंभीर आरोप, तो व्हिडिओ केला पोस्ट

Drone Spotted Over Matoshree : ड्रोनच्या माध्यमातून भाजप आणि सरकारकडून ठाकरेंवर नजर ठेवली जात आहे. सरकारकडून सुरक्षा पुरवली जात नाही, असा आरोप ठाकरेंच्या शिलेदारने केला आहे. मातोश्री बंगल्यावरील ड्रोनचा व्हिडिओ समोर आला आहे.

Namdeo Kumbhar

Drone spotted over Uddhav Thackeray’s Matoshree residence : उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीवर नजर ठेवली जात असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंचे शिलेदार अंबादास दानवे यांनी केला आहे. मातोश्री परिसरात ड्रोनच्या घिरट्या घालत असलेला व्हिडिओ पोस्ट करत दानवे यांनी गंभीर आरोप केला आहे. दानवेंच्या आरोपानंतर मुंबईमध्ये एकच राजकीय खळबळ उडाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत असतानाचा दानवेंच्या आरोपाने खळबळ उडाली आहे.

अंबादास दानवे यांनी एक सेकंदाचा छोटासा व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यामध्ये मातोश्री परिसरात ड्रोन घिरट्या घालत असल्याचे दिसतेय. दानवे यांनी ड्रोनचा व्हिडिओ पोस्ट करत असतानाच सरकारला आणि मुंबई पोलिसांना गंभीर प्रश्न विचारला आहे. त्यांनी मातोश्रीवरच्या सुरक्षेचा मुद्दाही उपस्थित केला आहे. दानवेंच्या आरोपानंतर राजकीय चर्चेला उधाण आले आहे. सुनील राऊत यांनी याप्रकरणी सरकारवर हल्लाबोल केला. त्यांनी आपला पोलिसांवर विश्वास नसल्याचे खेद व्यक्त केली. पोलिस सरकारसाठी काम करत असल्याचाही आरोप केला आहे. सरकारला ठाकरेंपासून भीती आहे, त्यामुळे त्यांच्यावर सतत लक्ष ठेवून आहेत, असेही ते म्हणाले. दरम्यान, परवानगी घेऊन सर्व्हेक्षणासाठी ड्रोन उडवल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.

दानवे यांनी नेमकं पोस्टमध्ये काय म्हटेलंय?

ड्रोन धोरणात मुंबई रेड झोनमध्ये समाविष्ट आहे. मग सध्या 'मातोश्री' निवस्थानाबाहेर मात्र असे ड्रोन सर्रास दिसायला लागले आहेत. सरकारच्या निदर्शनात ही गंभीर बाब आलेली नाही का? हाय सेक्युरिटी झोन असलेल्या 'मातोश्री'च्या परिसरात असे ड्रोन दिसणे आणि याची वाच्यता न होणे सरकारचे, गृह विभागाचे आणि मुंबई पोलिसांचे गांभीर्य दर्शवते, असे दानवे म्हणाले आहेत. मातोश्रीबाहेर गिरट्या घालणारे ड्रोन कुणाच्या मालकाचे आहेत? याबाबत पोलिसांकडून अद्याप कोणतीही माहिती आलेली नाही. ठाकरेंकडूनही याबाबत अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

मातोश्रीच्या बाहेर आज सकाळी ड्रोन घिरट्या घालत असल्याचे समोर आले. याचा व्हिडिओ दानवे यांनी पोस्ट केला आहे. सहानुभूती मिळवण्यासाठी हे केलेय का? किंवा कोणता सर्व्हे सुरू असेल अथवा किंवा कुणी तरी काय केले असेल असे वाटतेय. पोलिसांकडून याचा तपास करण्यात येईल. ड्रोन कुणी का उडवला? त्याचा उद्देश का केला? याचा तपास करण्यात येईल. असा ड्रोन फिरण्याचं कारण काय? याबाबत तपास करण्यात येत आहे. सहानुभूती मिळवण्यासाठी सरकारवर आरोप केला जातोय. खरे उत्तर हवे असेल तर थोडावेळ थांबावे, असे भाजप नेते प्रवीण दरेकर म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Smita Gondkar Photos: 'पप्पी दे पारूला' फेम अभिनेत्रीचा हॉट अंदाज, फोटो पाहून नजर भिरभिरेल

भाजपात पक्ष प्रवेशाचा धडाका; शिवसेना ठाकरे गट अन् काँग्रेसच्या बड्या नेत्यांच्या हाती कमळ

बाळासाहेबांच्या निधनानंतर शिवसेना संपवण्याचा भाजप–RSSचा कट; ठाकरेंच्या नेत्याचा मोठा गौप्यस्फोट|VIDEO

Gajar Halwa Recipe: कडाक्याच्या थंडीत बनवा गाजराचा गरमागरम हलवा, लगेच लिहून घ्या रेसिपी

Maharashtra Live News Update : मुंबई गोवा महामार्गावर खड्डयांमुळे झालेल्या अपघातात तीन कार एकमेकांवर धडकल्या

SCROLL FOR NEXT