Local Body Election : निवडणुकीपूर्वी ठाकरेंना मोठा धक्का, कल्याणच्या जिल्हाप्रमुखांसह ८ नगरसेवक भाजपमध्ये

Uddhav Thackeray faces setback in Kalyan : स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. कल्याण जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे आणि आठ माजी नगरसेवक भाजपमध्ये दाखल होणार आहेत.

Maharashtra local election BJP strategies : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसला आहे. कल्याणचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी आपल्या अनेक सहकाऱ्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश कऱण्याचा निर्णय घेतला आहे. 'पक्षात काम करण्यासाठी मर्यादित वाव आहे आणि मोकळीक नाही,' असे सांगत म्हात्रे यांनी आपला निर्णय जाहीर केला. त्यांच्यासोबत आठ माजी नगरसेवकही भाजपमध्ये सामील होणार आहेत, त्यामुळे कल्याण-डोंबिवलीतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हा पक्षबदल म्हणजे केवळ उद्धव ठाकरेंसाठीच नव्हे, तर महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या शिंदे गटासाठीही एक धक्का मानला जातोय. या घटनेमुळे आगामी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे गटासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com