Mumbai Crime News Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Crime News: अंमली पदार्थांची तस्करी करत होती केनियन महिला, डीआरआयने घेतलं ताब्यात

DRI Action: केक्यू 204 या नैरोबीहून मुंबईला आलेल्या विमानातील केनियाचे नागरिकत्व असलेल्या एका महिलेला डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी आज मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर ताब्यात घेतले.

साम टिव्ही ब्युरो

Mumbai Crime News:

केक्यू 204 या नैरोबीहून मुंबईला आलेल्या विमानातील केनियाचे नागरिकत्व असलेल्या एका महिलेला डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी आज मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर ताब्यात घेतले.

तिच्या सामानाची तपासणी केली असता, 1490 ग्रॅम वजनाची आणि काळ्या बाजारात 14.90 कोटी रुपये मूल्य असलेली बहुतेक कोकेनची पांढरी पावडर मिळाली आणि ती जप्त करण्यात आली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

केसांना लावण्‍यात येणाऱ्या कंडिशनरच्या बाटलीमध्ये आणि अंगाच्या साबणाच्या बाटलीमध्ये घालून, दोन काळ्या रंगाच्या पॉलिथिनच्या पिशव्यांमध्ये, ही अंमली पदार्थांची पांढरी पावडर मोठ्या खुबीने लपवून ठेवली होती. एनडीपीएस कायदा 1985 च्या तरतुदीनुसार या महिलेला अटक करण्यात आली असून तिची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. या अमली पदार्थ पुरवठा साखळीतील अन्य दुवे शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे. (Latest Marathi News)

5.7 कोटी रुपयांच्या सिगारेट काड्यांची तस्करी

आणखी एका प्रकरणात मुंबईच्या महसूल गुप्तचर संचालनालयाला मिळालेल्या माहितीनुसार,उरण येथील न्हावाशेवाच्या जवाहरलाल नेहरू बंदरात आलेला 40 फूट लांबीचा वातानुकूलित कंटेनर, न्हावा शेवा येथील ‘कंटेनर फ्रेट स्टेशन’ (CFS) अर्थात कंटेनर हाताळणी केंद्रात तपासणीसाठी काही काळ थांबवून ठेवण्यात आला.

कंटेनरमधील मालाची सखोल तपासणी केल्यावर, सिगारेटच्या कांड्या पुठ्ठ्याच्या खोक्यात कल्पकतेने लपवल्या असल्याचे आढळून आले. या खोक्यात, सागरी मालवाहतुकीच्या दस्तावेजात माल म्हणून चिंच भरली आहे, असे नमूद केले होते. सिगारेटच्या कांड्यांची पाकिटे मधल्या बाजूला ठेवण्‍यात आली होती. मालाचे खोके चहूबाजूने चिंचेने झाकली होती आणि चिंचेचा खोका उघडल्यानंतरही आतील सिगारेटस दिसणार नाहीत अशा पद्धतीने मोठ्या चतुराईने सिगारेटच्या कांड्या ठेवण्यात आल्या होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Police Death: पोलीस दलात आत्महत्येचं सत्र काही थांबेना! ४ दिवसात ३ आत्महत्या, काय आहे कारण?

Mahalaxmi Vrat 2025 : महालक्ष्मी व्रताची तारीख, पूजा विधी, महत्व घ्या जाणून

Maharashtra Live News Update: ते वक्तव्य करून अजित पवारांकडून मला टॉर्चर करण्याचा प्रयत्न; राम शिंदेंचा आरोप

Gunfire Shooting : क्लबमध्ये अंदाधुंद गोळीबार! तिघांचा जागीच मृत्यू, आठजण जखमी

Astro Tips: सकाळी उठल्यावर आरशात पाहणे शुभ असते की अशुभ?

SCROLL FOR NEXT