Petrol-Diesel Price: पेट्रोल आणि डिझेलचे दर 10 रुपयांनी होणार कमी? मोदी सरकार करू शकते मोठी घोषणा

Petrol-Diesel Price Cut: लवकरच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी कपात होऊ शकते. तेलाच्या किमती सहा ते दहा रुपयांनी कमी होऊ शकतात.
Petrol-Diesel Price News
Petrol-Diesel Price NewsSaam Tv
Published On

Petrol-Diesel Price Cut: 

देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. पेट्रोल-डिझेलच्या अधिक दरांमुळे इतर गोष्टीही महाग झाल्या आहेत. ज्याचा थेट फक्त हा सामान्य नागरिकांना बसत आहे. मात्र आता लवकरच महागाईने त्रस्त नागरिकांना मोदी सरकार काहीसा दिलासा देऊ शकते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लवकरच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी कपात होऊ शकते. तेलाच्या किमती सहा ते दहा रुपयांनी कमी होऊ शकतात. गेल्या अनेक दिवसांपासून देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही, अशी माहिती आहे. कच्च्या तेलाच्या किंमतीही खाली आल्या आहेत, त्याचा फायदा आता सरकार जनतेला देण्याची तयारी करत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Petrol-Diesel Price News
Viral Video: 'आमची जिम वापरायची नाही' म्हणत तरुणाला मारहाण, रागाच्या भरात डोळाच फोडला; पाहा CCTV VIDEO

पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्यासाठी केंद्र सरकार तेल कंपन्यांशी चर्चा करत आहे, अशी माहिती मिळत आहे. जेणेकरून आगामी काळात जनतेला दिलासा मिळू शकेल. मात्र सरकार ही सवलत केव्हा देणार याबाबत कोणतीही निश्चित तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. यातच नवीन वर्षाच्या सुरुवातीला पेट्रोलचे दर कमी होतील, अशी चर्चा आहे. (Latest Marathi News)

देशात तेलाच्या किंमती दरदिवशी ठरवल्या जातात. तेल कंपन्या दररोज आढावा घेतात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीनुसार पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ किंवा कमी करत असतात. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट कच्च्या तेलाची किंमत 78.71 डॉलर्सवर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्थ मंत्रालय आणि पेट्रोलियम मंत्रालयाने तेलाच्या किमती कमी करण्यासाठी ब्लू प्रिंट तयार केली असून यासाठी पंतप्रधान कार्यालयाच्या मंजुरी मिळावी म्हणून प्रतीक्षा केली जात आहे.

Petrol-Diesel Price News
Covid-19 JN.1: ‘जेएन-१’ घातक नाही; नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी: आरोग्यमंत्री

दरम्यान, 6 एप्रिल 2022 पासून दोन्ही इंधनांच्या रिफायनरीपूर्व किंमतींमध्ये कोणताही बदल न झाल्याने चालू आर्थिक वर्षात कच्च्या तेलाच्या कमी किमतींचा फायदा तीन राज्य तेल कंपन्यांना मिळाला आहे. यात इंडियन ऑइल कॉर्प (IOC), भारत पेट्रोलियम कॉर्प (BPCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन (HPL) कंपनी मोठा नफा झाला आहे. IOC, BPCL आणि HPCL यांनी या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत संयुक्तपणे 58,198 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com