Water Shortage  saam tv
मुंबई/पुणे

Dombivli News: डोंबिवलीत पाणीटंचाईने नागरिक त्रस्त; टँकर माफियांसाठी पाणीटंचाई केल्याची नागरिकांकडून शंका व्यक्त

Dombivli Water Shortage: श्रीराम नगर हा परिसर मनसे आमदार राजू पाटील यांच्या मतदार संघात आहे आणि कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या लोकसभा मतदार संघात सरद परिसर येतो.

साम टिव्ही ब्युरो

अभिजित देशमुख, कल्याण

Dombivli News:

डोंबिवली पूर्वेकडील आयरे गावात श्रीराम नगर येथे पाणीटंचाईने नागरिक त्रस्त आहेत. कमी दाबाने व अपुरा पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागतेय. पाणी येत नसल्याने नागरिक टँकर मागवतायत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पाचशे लिटर मागे नागरिकांना तीनशे रुपये मोजावे लागतायत. त्यामुळे नागरिकांच्या खिशाला भुर्दंड पडतोय. टँकर माफियांसाठी जाणून-बुजून पाणीटंचाई केली जाते का? असा सवाल संतप्त नागरिकांनी केलाय. श्रीराम नगर हा परिसर मनसे आमदार राजू पाटील यांच्या मतदार संघात आहे आणि कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्या लोकसभा मतदार संघात सरद परिसर येतो.

भाजप आमदार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण हे डोंबिवलीचे मंत्री आहेत. तरीही नागरीकांवर पाणी विकत घेऊन पिण्याची वेळ आली आहे. ही समस्या कधी सुटणार असा संतप्त प्रश्न नागरीकांकडून उपस्थित केला जात आहे.

एकिकडे स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असल्याचा दावा कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाकडून करण्यात येतोय. तर दुसरीकडे कल्याण डोंबिवली शहरात पाणी टंचाईमुळे नागरिक त्रस्त आहेत. डोंबिवलीतील आयरे गाव श्रीरामनगर परिसरात पाणीटंचाईमुळे कमी दाबाने व अपुरा पाणीपुरवठा होत आहे.

पाणीटंचाईवरून (Water Shortage) अनेकदा महापालिकेकडे तक्रारी केल्या गेल्यात. तसेच निवेदन देऊन आंदोलने केली आहेत. मात्र पाणी समस्या अद्याप सुटलेली नाही. पाणी नसल्याने येथील नागरिक पाचशे लिटर पाण्यासाठी तब्बल तीनशे रुपये टँकरला मोजत आहेत. या ठिकाणी नागरीक पाण्यासाठी वणवण फिरत आहे. गेल्या सात वर्षापासून नागरीक या समस्येचा सामना करत आहेत. जाणून बुजून टँकर माफियांकरीता कमी दाबाचा पाणी पुरवठा केला जात आहे अशी शंकाही नागरिकांकडून उपस्थित केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Alu Vadi Recipe: रोज मुलांना डब्यात काय द्यायचं? टेन्शन सोडा, बनवा कुरकुरीत आळू वडी; वाचा रेसिपी

Heart attack: हार्ट अटॅकचा धोका वाढवतात या 9 गोष्टी; लक्षणं ओळखून वेळीच उपचार करा

KKK 15 Winner : 'खतरों के खिलाडी १५' च्या ट्रॉफीवर कोणी कोरलं नाव? प्राईज मनीसोबत मिळाली एकापेक्षा एक आकर्षक बक्षिसे

Ujjal Bhuyan : "शरीरातून आत्मा बाहेर काढण्यासारखे..."; SIR मोहिमेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे सर्वात मोठे विधान

SCROLL FOR NEXT