Dombivali Tragedy Saam
मुंबई/पुणे

डोंबिवलीत तरूणानं ११ व्या मजल्यावरून मारली उडी; आधी लोंबकळत होता नंतर.. आत्महत्या की घातपात?

Youth Falls from 11th Floor: डोंबिवलीत ११ व्या मजल्यावरून उडी घेत तरूणानं आयुष्य संपवलं. आत्महत्या की घातपात? पोलिसांकडून अधिक तपास सुरू.

Bhagyashree Kamble

  • डोंबिवलीत भयंकर घडलं.

  • ११ व्या मजल्यावरून तरूणानं उडी मारली.

  • घटनेचा व्हिडिओ व्हायरल.

संघर्ष गांगुर्डे, साम टिव्ही

डोंबिवलीतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. ११ मजल्यावरून पडल्यामुळे तरूणाचा मृत्यू झाला. आत्महत्या की घातपात? की अन्य काही? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. आधी तरूण इमारतीच्या जिन्याच्या बाहेरील बाजूला पकडून उभा होता. नंतर त्यानं उडी मारली. तरूण थेट खाली कोसळला. समोरच्या इमारतीतून एकानं याचा व्हिडिओ शूट केला. तसेच शेअर केला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या पोलिसांकडून तपास सुरू आहे.

ऋषिकेश परब (वय वर्ष २२) असं मृत तरूणाचे नाव आहे. तो डोंबिवली पश्चिमेतील राहुलनगर येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. काही वादामुळे परब त्रस्त होता. आत्महत्या करण्यापूर्वी तो बराचवेळ जिन्यावर बसून होता. नंतर इमारतीच्या भिंतीला पकडून लोंबकळत होता. यावेळी फायर ब्रिगेड आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

त्यांनी तरूणाला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानं हात सोडून उडी घेतली. ११व्या मजल्यावरून उडी घेतल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. एकानं तरूणाचा व्हिडिओ शूट केला. तसेच समाज माध्यमांमध्ये शेअर केला. याचा व्हिडिओ आता समोर आला आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतलं आहे.

या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. तरूणानं आत्महत्या का केली? आत्महत्या करण्यामागचं कारण काय? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल

वाहनाचे इंजिन ऑइल खराब झाले हे कसं ओळखायचं? ही १ गोष्ट लक्षात ठेवा

Fort History : २६ वर्षे मराठा साम्राज्याची राजधानी, मुघलही थकले, पण जिंकू शकले नाहीत हा अभेद्य किल्ला

PM Care Fund मध्ये बॅलन्स किती?सरकारकडून आकडेवारी सार्वजनिक

श्रावण स्पेशल मालवणी स्टाईल खुसखुशीत अळूवडी; सोपी रेसिपी आजच करून पाहा!

SCROLL FOR NEXT