Cylinder Blast In Dombivli Chinese Center Saam Tv
मुंबई/पुणे

Dombivli News: डोंबिवली पुन्हा हादरली! केमिकल ब्लास्टनंतर सिलिंडरचा भीषण स्फोट, आग शमवणारेच आगीच्या कचाट्यात

Cylinder Blast In Dombivli Chinese Center: डोंबिवली एमआयडीसीतील कंपनीमध्ये स्फोट झाल्याची घटना ताजी असतानाच एका चायनिज सेंटरमध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन ९ जण जखमी झाले आहेत.

Priya More

डोंबिवली एमआयडीसी (Dombivli MIDC) अमूदान कंपनीमध्ये झालेल्या भीषण स्फोटामध्ये ११ जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच डोंबिवलीमध्ये सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. चायनीज सेंटरमधील सिंलेडरचा स्फोट होऊन ९ जण जखमी झाले आहेत. सायंकाळी ५ च्या सुमारास ही घटना घडली. अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग विझवली.

मिळालेल्या माहितीनुसार, एमआयडीसीतील अमुदान या रासायनिक कंपनीत स्फोटाच्या घटनेला आठ दिवसांचाही कालावधी उलटत नाही तोवरच डोंबिवलीतील टंडन रोडवरील सिध्दी चायनीज सेंटरमध्ये आग लागून सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटामध्ये ९ जण जखमी झाल्याची घटना सायंकाळी पाच वाजता घडली.

सिलेंडर स्फोटामध्ये जखमी झालेल्यांमध्ये ३ जणांना केडीएमसीच्या शास्त्रीनगर सामान्य रुग्णालयात तर इतर सहा जणांना नजीकच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेमध्ये ७ जण किरकोळ जखमी झालेत. तर अन्य दोघेजण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

चायनीज सेंटर बंद असताना ही घटना घडली आहे. बंद सेंटरला आग लागल्याने ती विझविण्यासाठी आजूबाजूच्या वसाहतीमधील रहिवासी धावले. अशातच अचानक चायनीज सेंटरमधील सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटामध्ये ९ जण जखमी झाले. सर्वांना तातडीने रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले गेले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shivani Rangole: टिव्हीतल्या 'मास्तरीणबाई' चं सौंदर्य लाखात एक, फोटोंवर लाईक्स

Maharashtra Live News Update: खराडी पार्टीवर केलेली कारवाई राजकीय दृष्टिकोनातून करण्यात आली नाही ना? - रोहित पवार

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

SCROLL FOR NEXT