kalyan news  saam tv
मुंबई/पुणे

Kalyan-Dombivli News : डोंबिवलीकरांच्या मनात एकच प्रश्न अन् भीती; ते काळे आणि हिरवे ठिपके कसले?

Mysterious Black and Green Spots : डोंबिवली येथील एका परिसरात सर्व गाड्यांवर आणि घरांवर काळे आणि हिरवे ठिपके पडले आहे, यामुळे नागरिकांनी एक वेगळा संशय व्यक्त केला आहे.

Omkar Sonawane

डोंबिवली एमआयडीसी परिसरात प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या आधी देखील हिरवा पाऊस, रस्त्यावर वाहणारे रासायनिक सांडपाणी ,उग्रवास यामुळे परिसरात नागरिक प्रदूषणाच्या समस्येने त्रस्त होते. त्यातच आज एमआयडीसी मिलाप नगर परिसरात गाड्यांवर ,पत्र्याच्या शेडवर आणि कपड्यावर पडलेल्या काळया ठिपक्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले आहे. धक्कादायक म्हणजे गाड्या धुवून देखील हे ठिपके जात नसल्याने हे काळे ठिपके प्रदूषणामुळे पडल्याचा संशय व्यक्त करत नागरिकांनी याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाला माहिती दिली.

प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत या ठिपक्यांचे नमुने घेतले असून तपासणीसाठी प्रयोगशाळेत दिले आहे. अहवाल आल्यानंतर या मागचं नेमकं कारण स्पष्ट होईल. मात्र या घटनेमुळे डोंबिवली एमआयडीसी परिसरात राहणाऱ्या नागरिकांमध्ये मात्र भीतीचे वातावरण पसरले आहे .

डोंबिवली एमआयडीसी मिलाप नगर परिसरात आज गाड्यांवर काळे ठिपके पडल्याचं काही नागरिकांच्या लक्षात आलं. काही नागरिकांनी हे डाग पत्र्याच्या शेडवर तसेच कपड्यांवर देखील पडल्याचे सांगितले. नागरिकांनी मिलापनगर तसेच एम्स हॉस्पिटल परिसरात पाहणी केली असता रस्त्याच्याकडेला उभ्या असलेल्या गाड्यांवर देखील काळे ठिपके आढळून आले. त्यामुळे हे काळे ठिपके प्रदूषणामुळे की यामागे आणखी काही कारण आहे याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

नागरिकांनी याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाला माहिती दिली प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पथक घटनास्थळी दाखल झालं. त्यांनी या परिसरातील पाहणी केली .या काळ्या ठिपक्यांचे सॅम्पल प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पथकाने घेतले असून लवकरच त्याचा अहवाल येईल व या मागचं नेमकं कारण स्पष्ट होईल असं प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं तर दुसरीकडे नागरिकांनी प्रदूषणामुळे काळे ठिपके पडल्याचा संशय व्यक्त केला आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने लवकरात लवकर याबाबतचा अहवाल मागवून प्रदूषणबाबत निर्णय घ्यावा अशी मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Rave Party : खडसेंच्या जावयाला रेव्ह पार्टीत अटक, कट्टर विरोधक गिरिश महाजनांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

महिलांचा रस्त्यावर राडा! शेजारच्या वादातून सुरू झाली हाणामारी;VIDEO

Hyundai Kia SUV: ग्राहकांसाठी खुशखबर! ह्युंदाई आणि किआ लाँच करणार 3 नव्या कॉम्पॅक्ट मॉडेल्स

Pune Rave Party: भाजप म्हणजेच 'रेव्ह पार्टी', रोहिणी खडसेंच्या नवऱ्याला अटकेनंतर संजय राऊत संतापले

SCROLL FOR NEXT