Dombivli Manpada Police, Dombivli
Dombivli Manpada Police, Dombivli saam tv
मुंबई/पुणे

Dombivli Manpada Police News : छोट्या व्यावसायिकांसह कार चालकांना लुटणारी टाेळी जेरबंद; ११ मोबाईल, लॅपटॉप, रिक्षा जप्त

Siddharth Latkar

- अभिजीत देशमुख

Dombivli News : डोंबिवलीसह कल्याण ग्रामीण भागात ओला चालक ,छोट्या व्यावसायिकांना चाकूचा धाक दाखवत लुटणाऱ्या दरोडेखोर टोळीचा डोंबिवली मानपाडा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या टोळीतील तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच टाेळीतील एका अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले असून आणखी एकाचा शाेध सुरु असल्याची माहिती पाेलिसांनी दिली. (Maharashtra News)

ओला बुक करून पाच जणांच्या टोळीने ओला चालकाला मारहाण करत त्याच्याजवळील मोबाईल व रोकड लुटल्याची घटना डोंबिवलीमध्ये घडली होती. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात (dombivli manpada police station) गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी डीसीपी सचिन गुंजाळ, एसीपी सुनील कुऱ्हाडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय सुनील तारमळे, अविनाश वनवे ,सुरेश डांबरे यांच्या पथकाने या संशयित आरोपींचा शोध सुरू केला.

या भागातील सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपास करत पोलिसांनी या संशियतांचा ठावठिकाणा मिळवला. डोंबिवली येथे विविध ठिकाणी सापळा रचत पोलिसांनी या पाच जणांच्या टोळीचा म्होरक्या चंद्रकांत उर्फ मोठा चंद्या जमादार याच्यासह शिवा तूसंबल, सत्यप्रकाश कनोजिया या तिघांना अटक केली. या टोळीतील एका अल्पवयीन साथीदाराला पाेलिसांनी ताब्यात घेतले. तर आणखी एका अल्पवयीन साथीदाराचा पोलीस शोध घेत आहेत.

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार चंद्रकांत उर्फ मोठा चंद्या जमादार याच्यासह, शिवा तूसंबल ,सत्यप्रकाश कनोजिया व त्यांचे दोन अल्पवयीन साथीदार गुन्हेगारी पार्शवभूमीचे आहेत. चंद्रकांत उर्फ मोठा चंद्या जमादार याच्याविरोधात तडीपारीची कारवाई देखील करण्यात आली आहे. तडीपार असताना तो आपल्या साथीदारांसह डोंबिवली कल्याण ग्रामीण भागात लुटपाट करत असे.

पाेलिसांनी अटकेतील संशयितांकडून रोख रक्कम ,११ मोबाईल फोन, लॅपटॉप, रिक्षा असा दोन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या टोळी विरोधात डोंबिवली, टिळक नगर खडकपाडा, हीललाईन पोलीस ठाण्यात खून, दरोडा, दरोड्याची तयारी, जबरी चोरी,घरफोडी अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. या टोळीवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती एसीपी सुनील कुराडे यांनी दिली.

अशी करायची लुटपाट

या टोळीने कल्याण ग्रामीण डोंबिवली परिसरात धुमाकूळ घातला होता. ही पाच जणांची टोळी ओला कार बुक करायची. यामधील तीन गाडीत बसायचे तर उर्वरित दोन जण रिक्षाने ओला गाडीचा पाठलाग करत.

सूनसान जागेत गाडी थांबवून ओला चालकाला चाकूचा धाक दाखवून लुटायचे. इतकेच नव्हे रस्त्याने एखाद्या वाहनाला कट मारत मुद्दाम वाद घालत मारहाण करत गाडी चालकाला लुटायचे तर कधी लुटण्याच्या उद्देशाने प्रवाशाला रिक्षात बसवून लूबाडत होते. या भागातील हातगाड्या लावणाऱ्या छोट्या व्यावसायिकांना चाकूचा दाखवत त्यांच्या जवळील मोबाईल , रोकड हिसकावून निघून जायचे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pandharpur News : भाविकांसाठी आनंदाची बातमी! तब्बल अडीज महिन्यानंतर पंढरपूरच्या विठुरायाचे पदस्पर्श दर्शन सुरू

Maharashtra Rain Alert : मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात आज पावसाची शक्यता; वाचा कुठे-कुठे कोसळणार पाऊस?

Horoscope Today : आज 'या' राशींच्या लोकांना मिळणार प्रत्येक कामात यश

Rashi Bhavishya : 'या' राशींना सापडतील नवे मार्ग; मनासारख्या घडतील घटना; वाचा आजचे राशी भविष्य

Singh Rashi Personality : कामात चतुराई, उदार अन् उमदा स्वभाव; सिंह राशीचे लोक नेमके कसे असतात? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT