Dharashiv LCB News: LCB ची माेठी कारवाई, पालिकेच्या तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांना अटक

LCB Arrests Harikalyan Yelgatte: यलगट्टे यांच्या शोधासाठी पाेलिसांची पथके तयार करण्यात आली होती.
Dharashiv News, harikalyan yelgatte, nashik
Dharashiv News, harikalyan yelgatte, nashiksaam tv
Published On

- कैलास चाैधरी

Dharashiv News : फसवणूक आणि शिवीगाळ प्रकरणात पाेलिसांच्या रडारावर असलेल्या धाराशिव पालिकेच्या तत्कालीन मुख्याधिकारी हरिकल्याण यलगट्टे (harikalyan yelgatte) यांना नाशकातून नुकतीच अटक करण्यात आली आहे. पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथून ताब्यात घेतले. (Breaking Marathi News)

Dharashiv News, harikalyan yelgatte, nashik
MPSC Success Story : झेडपीच्या शाळेत शिकलेल्या बीडच्या सीमा शेखने राेवला एमपीएससीत झेंडा; राज्यात महिलांत प्रथम

हरीकल्याण यलगट्टे यांच्यावर बांधकाम परवान्यात शासनाची फसवणूक व जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यांच्यावर विधान परिषद सदस्य आमदार सुरेश धस यांनी हक्कभंग दाखल केला आहे. यलगट्टे यांचा पाेलिस शाेध घेत हाेते.

Dharashiv News, harikalyan yelgatte, nashik
Covid 19 चा धाेका वाढला, साता-यानंतर महाराष्ट्रात मास्क सक्तीचं होणार?; आरोग्यमंत्री म्हणाले...

यलगट्टे यांच्या शोधासाठी पथके तयार करण्यात आली होती. यलगट्टे यांनी धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथून ताब्यात घेतले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक यशवंत जाधव, आनंद नगर पोलिस ठाण्याचे दिलीप पारेकर, शहर पोलीस ठाण्याचे उस्मान शेख तसेच पथकांतील कर्मचा-यांनी केली.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com