Desai Creek, Dombivli: Suitcase containing the body of a 25-year-old woman recovered; police launch murder investigation. saamt v
मुंबई/पुणे

Dombivli Crime: सुटकेसमध्ये आढळला २५ वर्षीय महिलेचा मृतदेह, खाडीत फेकली होती बॅग

25-Year-Old Woman dead Body Found In Suitcase : डोंबिवलीमध्ये एका २५ वर्षीय महिलेचा मृतदेह आढळलाय. एका सुटकेसमध्ये हा मृतदेह होता.पलावा सिटीजवळील देसाई खाडीत ही सुटकेस फेकण्यात आली होती. पोलीस, गुन्हे शाखा आणि फॉरेन्सिक पथके या हत्येचा तपास करत आहे.

Bharat Jadhav

  • २५ वर्षीय मुलीचा मृतदेह सुटकेस मध्ये सापडला

  • महिलेचा खून करून सुटकेसमध्ये मृतदेह कोंबण्यात आला होता.

  • ⁠डोंबिवली येथील डायघर परिसरातील घटना

विजय काटे, साम प्रतिनिधी

डोंबिवलीमधील डायघर परिसरातील खाडीत एका सुटकेसमध्ये २५ महिलेचा मृतदेह सापडला आहे. डायघर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पलावा सिटीजवळ देसाई खाडीत हा मृतदेह सापडलाय. पोलिसांना दुपारी याबाबत माहिती मिळाली होती. दरम्यान खाडीत मृतदेह आढळून आल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे.

घटनास्थळी डायघर पोलीस ठाण्याचे पोलीस पथक, क्राइम ब्राच,फॉरेन्सिक पथकासह दाखल झालेत. त्यांनी पंचनामा करून मृतदेह छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय कळवा येथे शवविच्छेदनासाठी रवाना केला आहे. मृतदेहाची ओळख पटवून हत्येच्या गुन्ह्याचा तपास डायघर पोलीस करीत आहेत. पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार, ⁠महिलेवर अत्याचार झाले असावेत. त्यानंतर तिची हत्या करण्यात आली.

त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी महिलेचा मृतदेह सुटकेसमध्ये भरून खाडीत फेकला असावा अंदाज पोलिसांनी वर्तवलाय. दरम्यान महिलेचा मृत्यू कशामुळे झाला? तिची ओळख काय आहे? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. त्याचबरोबर सुटकेस खाडीत टाकली होती का खाडीच्या पाण्यात वाहून आली, याचाही पोलीस तपास करत आहेत.

मुलीसमोरच आईची केली हत्या, अकोल्यातील घटना

चारित्र्याच्या संशयातून पतीनेच पत्नीची हत्या केल्याची घटना अकोल्यातल्या अकोट राजू नगर भागात घटना घडली आहे. शेख शमिम शेख राजू असं मृत पत्नीच नाव आहे. शेख राजू शेख निजाम असं मारेकरी पतीच नाव आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजलीय. शेख राजू आणि त्याच्या पत्नीमध्ये दररोज चारित्र्याच्या संशयावरून वाद व्हायचा. शेख राजू हा त्याच्या पत्नीवर संशय घेत होता, त्यामुळे तो त्याच्या पत्नीला सतत मारहाण करायचा. आजदेखील शेख राजू याने चारित्राच्या संशयावरूनच वाद घातला. भांडण सुरू असतानाच त्याने तिला मारहाण केली. शेख राजू याला राग अनावर झाल्यानंतर त्याने चाकूने बायकोच्या गळ्यावर वार केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check : आता पाईपलाईननं दारू मिळणार? सरकारकडे अर्ज केल्यानंतर कनेक्शन?

Smriti Mandhana: स्मृती मानधना-पलाशचं लग्न का पुढे ढकललं? कधी होणार लगीन? मुच्छलच्या बहिणीचा मोठा खुलासा

बिबट्या आला रे...! आधी गावात दहशत, आता पुणे शहरात एन्ट्री, VIDEO

धनंजय मुंडेंना 'कराड'ची ओढ? कराडच्या आठवणीनं मुंडे व्याकूळ, VIDEO

Ethiopia volcano : इथियोपियात १०००० वर्षांनंतर ज्वालामुखीचा उद्रेक; आकाशात १०-१५ किमी उंच उडाले राखेचे कण, भारतावर संकट?

SCROLL FOR NEXT