Police investigation underway at the crime scene near Kopar Railway Station in Dombivli after a brutal late-night murder. Saam Tv
मुंबई/पुणे

रेल्वे स्टेशनबाहेरच रक्तरंजित थरार, चाकू आणि लोखंडी रॉडने ४० वार, तरूणाचा जागीच मृत्यू

Brutal Murder Outside Kopar Railway Station Dombivli: डोंबिवलीतील कोपर रेल्वे स्टेशनजवळ जुन्या वैमनस्यातून तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. चाकू व लोखंडी रॉडने ४० वार करून खून करण्यात आला असून पोलिसांनी १२ तासांत तीन आरोपींना अटक केली आहे.

Omkar Sonawane

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

डोंबिवली पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात १३ डिसेंबर रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास आर. के. एस्टेट, कोपर रेल्वे स्टेशनजवळ भीषण हत्या झाल्याची घटना घडली. जुन्या वादाच्या रागातून आरोपींनी नरेंद्र उर्फ काल्या भालचंद्र जाधव (वय ३७) यांच्यावर कोयता, चाकू व लोखंडी रॉडने तब्बल ४० वार करत निर्घृण खून केला.

प्राथमिक माहितीनुसार, आरोपींनी संगनमत करून नरेंद्र जाधव यांना तु यहाँ क्यों आया, अब यहाँ से जाने नहीं देंगे, तुझे यही खत्म कर देंगे अशी धमकी देत शिवीगाळ केली. त्यानंतर डोके, मान, गळा, छाती, पोट, पाठ तसेच हात-पायांवर प्राणघातक वार करण्यात आले. या हल्ल्यात नरेंद्र जाधव यांचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, हल्ला थांबविण्यासाठी फिर्यादी नरेंद्र याचा मित्र शुभम राजेश पांडे वय २७ मध्ये पडले असता आरोपी आकाश बिराजदार याने तू बीच में आया तो तुझे खत्म कर देंगे अशी धमकी देत त्यांच्या डोक्यावर चाकूने वार केला. इतर आरोपींनीही हाताबुक्क्यांनी मारहाण केल्याने शुभम पांडे गंभीर जखमी झाले आहेत.

या प्रकरणी डोंबिवली पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेनंतर पोलीस उपायुक्त परिमंडळ ३, कल्याण व सहायक पोलीस आयुक्त डोंबिवली विभाग यांच्या सूचनेनुसार तात्काळ विशेष तपास पथके तयार करण्यात आली. घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा मार्ग काढण्यात आला. मोबाईल लोकेशनच्या मदतीने दिवा वेस्ट परिसरात छापा टाकून अवघ्या १२ तासांत मुख्य आरोपी आकाश गौरीशंकर बिराजदार वय २९याच्यासह दिवाकर महेशचंद्र गुप्ता वय १८ आणि आलिफ शहादाब खान वय १८ या तिघांना अटक करण्यात आली.

पोलिस तपासात उघड झाले की, जुन्या वैमनस्यातूनच हा खून करण्यात आला. आरोपींनी कोयता व चाकूने नरेंद्र जाधव यांच्यावर ४० वार करून त्यांचा खून केला तसेच फिर्यादी शुभम पांडे यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. पुढील तपास डोंबिवली पोलीस करत असून इतर सहभागी आरोपींचा शोध सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss Marathi 6 : अंकिता वालावलकरच्या नवऱ्याचं 'बिग बॉस मराठी'शी खास नातं, कोकण हार्टेड गर्लनं VIDEO शेअर करत केला खुलासा

Maharashtra Live News Update: अशोक चव्हाण यांच्या समर्थकांकडून आचारसंहितेचा भंग

Accident: आनंदावर विरजन! लग्नाला जाताना समृद्धी महामार्गावर कार उलटली; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू,अपघातापूर्वीचा VIDEO समोर

आचारसंहिता लागली! ३१ डिसेंबरची पार्टी करण्यापूर्वी नक्की वाचा, अन्यथा मद्यपींना होणार अटक, वाचा नियम काय सांगतो

Liver Damage: काय सांगता खरं की काय! त्वचेवर काळे डाग आणि लिव्हरचा काही संबंध आहे का? 5 गोष्टी जाणून घ्यायलाच हव्यात

SCROLL FOR NEXT