crime update  saam tv
मुंबई/पुणे

Dombivali: डोंबिवली हादरली! रिक्षाचालकाकडून गतिमंद महिलेवर अत्याचार; अज्ञातस्थळी नेलं अन्...

Dombivli Police Arrest Auto Rickshaw Driver: डोंबिवलीत एका ३० वर्षीय गतिमंद महिलेवर रिक्षाचालकाने अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.

Bhagyashree Kamble

अभिजीत देशमुख, साम टीव्ही

राज्यात अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अशातच डोंबिवलीतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. डोंबिवलीत एका ३० वर्षीय गतिमंद महिलेवर रिक्षाचालकाने अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. ही गतीमंद महिला आपल्या नातेवाइकांकडे जात होती. यावेळी रिक्षाचालकाने तिला अज्ञात ठिकाणी नेऊन अमानुष कृत्य केलं.

या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी काही तासांत आरोपी फैजल खानला अटक केली आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

नेमकं प्रकरण काय?

डोंबिवली शहरात एका ३० वर्षीय गतिमंद महिलेवर रिक्षाचालकाने अत्याचार केला आहे. पीडित महिला सोनारपाडा येथील नातेवाइकांकडे जात होती. यावेळी रिक्षाचालकाने महिला गतिमंद असल्याचा फायदा घेत तिला मुंब्रा येथील अज्ञात ठिकाणी नेले. तसेच तिच्यावर अमानुष अत्याचार केला. दुसऱ्या दिवशी पीडितेने घडलेला प्रकार आपल्या कुटुंबाला सांगितला.

याप्रकरणाची माहिती पीडित कुटुंबाला मिळाल्यानंतर त्यांनी टिळक नगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. तसेच आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. फैजल खान असे या आरोपी रिक्षाचालकाचे नाव असून, टिळक नगर पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन त्याला तत्काळ कारवाई करत अटक केली आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत असून, आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. या संतापजनक घटनेनंतर ग्रामस्थांनी रोष व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Apoorva Nemalekar : “प्रवास सोप्पा नव्हता...'' मालिकेला निरोप देताना अपूर्वाची भावूक पोस्ट व्हायरल

Maharashtra Live News Update: इगतपुरी तालुक्यातील भावली धरण ओव्हर फ्लो

Rupali Bhosle: 'रूप तेरा मस्ताना' रूपाली भोसलेचे फोटो पाहून तुम्हीही हेच म्हणाल...

Politics: 'केम छो शिंदेसाहेब..' जय गुजरातच्या घोषणेवर एकनाथ शिंदेंवर टीकेचा पाऊस, राष्ट्रावादी काँग्रेसच्या आमदारानं डिवचलं

Bhiwandi Police : भिवंडीत गांजा विक्री करणारे तिघे ताब्यात; ३७ लाखाचा गांजा जप्त

SCROLL FOR NEXT