Local Accident: धावत्या लोकलमधून पडून आणखी एकाचा बळी, अंबरनाथहून उल्हासनगरला जात असताना अपघात; जागीच मृत्यू

Tragic Train Accident Claims Young Life in Ulhasnagar: उल्हासनगर आणि अंबरनाथ रेल्वे स्थानकांदरम्यान एका दुर्दैवी रेल्वे अपघातात २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे.
Ulhasnagar
UlhasnagarSaam
Published On

अजय दुधाणे, साम टीव्ही

उल्हासनगर आणि अंबरनाथ रेल्वे स्थानकागदरम्यान, एक दुर्देवी रेल्वे अपघात घडला आहे. या भीषण रेल्वे अपघातात तरूणाचा जागीच मृत्यू झाला आहे. मृत तरूण अंबरनाथ येथील रहिवासी असून, तो अंबरनाथहून उल्हासनगरकडे लोकलने प्रवास करत असताना ट्रेनमधून पडला. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. या दुर्देवी अपघातानंतर परिसरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे.

गेल्या काही दिवसांपासून रेल्वे अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होत चालली आहे. एक तरूण नोकरीला जात असताना त्याचा धावच्या लोकलमधून पडून मृत्यू झाला होता. त्यानंतर धावत्या लोकलमधून पडून आणखी एका तरूणाचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रोहित मगर असे मृत तरूणाचे नाव आहे. तो २५ वर्षांचा होता. हा तरूण उल्हासनगरमधील सम्राट अशोक नगर परिसरातील रहिवासी होता.

Ulhasnagar
Ahilyanagar: शिक्षक की हैवान? भर वर्गात शिक्षकाचे विद्यार्थिनींसमोर अश्लील चाळे, अहिल्यानगरमधील संतापजनक घटना

मृत तरूण अंबरनाथहून उल्हासनगरकडे जात असल्याची माहिती समोर आली आहे. लोकलने प्रवास करत असाताना कानसाई ते उल्हासनगर दरम्यान तो लोकलमधून खाली पडला. धावत्या ट्रेनमधून खाली पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

Ulhasnagar
MNS News: "तर, भैय्यांना मुंबईत राहू द्यायचं की नाही..." राज ठाकरेंच्या मनसेचा भाजपला इशारा

अपघाताची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच मृतदेह ताब्यात घेत उल्हासनगरच्या मध्यवर्ती रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले. हा अपघात कसा घडला, याचा शोध पोलीस घेत आहेत. या दुर्देवी घटनेनंतर परिसरातून खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com