Dombivli Baby Sitting  Saam tv
मुंबई/पुणे

Dombivli Day Care Centre : पाळणाघरातील धक्कादायक प्रकार; चिमुकल्या मुलांना बांधून लाकडीपट्टीने मारहाण, घटना कॅमेरात कैद

Vishal Gangurde

अभिजीत देशमुख, कल्याण

Dombivli Baby Sitting News :

पाळणाघरामध्ये ठेवणाऱ्या पालकांसाठी अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. डोंबिवलीतील हॅप्पी किड्स डे केअर सेंटर चालवणाऱ्यांसह कर्मचाऱ्यांकडून मुलांना होणारी मारहाण आणि संतापजनक वागणुकीचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओनंतर ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी कविता गावंड यांच्या मदतीने संतप्त पालकांनी डोंबिवली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. या प्रकरणी पाळणाघर चालवणाऱ्या गणेश प्रभुणे, आरती प्रभुणे या दाम्पत्यासह राधा नाखरे या महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पोलिसांनी तपास सुरु केला आहे. (Latest Marathi News)

सध्याच्या काळात संसाराचा गाडा हाकण्यासाठी पती-पत्नी दोघे कामावर जातात. लहान मुलांची परवड होऊ नये, त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावेत म्हणून या चिमुकल्यांना पाळणाघरात ठेवले जाते. त्यासाठी पाळणाघर चालवणाऱ्यांना पैसे देखील जातात. मात्र त्यानंतर काही पाळणाघरामध्ये या चिमुकल्या जिवाला मानसिक आणि शारीरिक त्रास दिला जात असल्याचा अनेक घटना उजेडात आल्यात. डोंबिवलीत देखील असाच संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे.

डोंबिवली पूर्वेत राहणारे मंदार उगले आणि त्यांची पत्नी हे दोघे कामावर जातात. त्यांची तीन वर्षाची मुलगी ही डोंबिवली फडके रोड येथील हॅपी किड्स डे केअर या पाळणाघरात ठेवतात. हे पाळणाघर प्रभुणे दाम्पत्य चालवतात. त्यामुळे मुलीला सांभाळण्यासाठी हे दाम्पत्यांना साडेआठ हजार रुपये रक्कम उगले यांच्याकडून घेते. गणेश प्रभुणे त्यांची पत्नी आरती प्रभुणे आणि राधा नखरे हे तिघे लहान मुलांचा सांभाळ करतात. उगले यांच्या मुलीसोबत आणखी अनेक लहान मुलं या पाळणाघरात सांभाळण्यासाठी ठेवले जातात. प्रभुणे दाम्पत्य आणि राधा नाखरे यांच्याकडून लहान मुलांना बांधून ठेवले जात होते. त्याला मारहाण केली जात होती. त्यांना मानसिक आणि शारीरिक त्रास दिला जात होता.

याच दरम्यान या पाळणाघरात साधना सामंत ही महिला देखील काम करण्यास गेली. तिने हा सगळा धक्कादायक प्रकार पाहिला. तिने सुरुवातीला विरोध केला. मात्र प्रभुणे दाम्पत्य काही ऐकत नव्हते. अखेर सामंत यांनी या सर्व प्रकारचा कॅमेरात कैद केला. हा व्हिडिओ ठाकरे गटाच्या पदाधिकारी कविता गावंड यांना दिला. त्यानंतर कविता गावंडे यांनी संबंधित पालकांना फोन करून सगळ्या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पालकांनी गावंड यांच्यासहित रामनगर पोलीस ठाणे गाठले.

सुरुवातीला पोलिसांनी तुम्ही चाईल्ड वेल्फेर मध्ये जा, अस सांगत तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली. मात्र घटनेची माहिती एसीपी सुनील कुऱ्हाडे यांना मिळाली. कुऱ्हाडे यांनी तात्काळ तक्रार दाखल करून घेण्यास सांगितले. त्यानंतर रामनगर पोलीस ठाण्यात गणेश प्रभुणे, आरती प्रभुणे या दांपत्यासह राधा नाखरे या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

या धक्कादायक घटनेमुळे डोंबिवलीमध्ये एकच खळबळ उडाली आहे. चिमुकल्या लहान मुलांना शारीरिक आणि मानसिक त्रास देणाऱ्या अशा विकृत प्रवृत्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohit sharma: होय..माझा 'तो' निर्णय चुकला! रोहित शर्माने का मागितली माफी?

Bus Accident : घाट रस्त्यात बसचा अपघात; विद्यार्थ्यांसह ४० प्रवाशी जखमी

Maharashtra Politics: पुणे, सोलापूर ते लातूर, संगमनेर; काँग्रेसची उमेदवारी यादी रवींद्र धंगेकरांनी टाकली अन् डिलीट केली

Maharashtra News Live Updates: पपई पिकावर मोझॅक रोगाच्या प्रादुर्भाव, शेतकरी हवालदिल

Poha Chivda: दिवाळीसाठी घरी खमंग अन् कुरकुरीत बनवा पोह्यांचा चिवडा

SCROLL FOR NEXT