Dombivali Crime Saam tv
मुंबई/पुणे

Dombivali Crime: मस्करी करणाऱ्या मित्रालाच बेदम मारहाण; चाकूचा धाक दाखवून लुटले

Dombivali News: प्रकरणाचा तपास कल्याण क्राईम ब्रँचने सुरु केला. या तपासादरम्यान सीसीटीव्हीच्या साह्याने अक्षय उर्फ सोनू दाते हा सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख 
डोंबिवली
: मित्र असल्याने मस्करी सुरु होती. या मस्करीमध्ये मित्राला काळ्या बोलला. परंतु याचा तरुणाला राग आल्याने आता (Dombivali) मी सहा वर्षांपूर्वीचा सोन्या नाही, मी भाई आहे असं म्हणत मित्रालाच बेदम मारहाण केली. इतकेच नाही तर त्याच्याजवळील रोकड हिसकावली व पसार झाला. अक्षय उर्फ सोनू दाते असे मारहाण करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. सोनू हा सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले. (Kalyan) कल्याण क्राईम ब्रँचने अक्षय उर्फ सोनू दाते व त्याच्या साथीदाराला बेड्या ठोकल्यात. (Maharasthra News)

डोंबिवली पूर्वेकडील चिमणी गल्ली परिसरात हर्षद सरवदे हे चहा पीत होते. याच वेळी त्या ठिकाणी अक्षय उर्फ सोनू दाते व त्याचे दोन साथीदार आले. सोनू याने हर्षद यांना तू मला काळा का म्हणालास, आत्ता मार्केट खूप बदललं, पहिल्यासारखा सोन्या राहिलो नाही. तर लहानपणी पाहिलेला सोनू आता भाई आहे असा दम भरला. त्यानंतर सोनू याने दोन साथीदारांच्या मदतीने हर्षदला चाकूचा धाक दाखवत (Crime News) लुटले व तेथून पसार झाला. याप्रकरणी डोंबिवली (Police) पोलीस ठाण्यात अक्षय उर्फ सोनू दाते व त्याच्या दोन साथीदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दोन वर्षासाठी होता तडीपार 

या प्रकरणाचा तपास कल्याण क्राईम ब्रँचने सुरु केला. या तपासादरम्यान सीसीटीव्हीच्या साह्याने अक्षय उर्फ सोनू दाते हा सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. अक्षय हा दोन वर्षासाठी ठाणे व रायगड जिल्ह्यातून तडीपार होता. कल्याण क्राईम ब्रँचने सोनूचा शोध सुरू करत अवघ्या २४ तासात सोनुला डोंबिवलीमधील फडके रोड परिसरातून कल्याण क्राईम ब्रांचने सापळा रचत बेड्या ठोकल्या. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope : परिस्थितीशी दोन हात करावे लागणार; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात मोठं काही तरी घडणार

Aravallis Hills: अरवली पर्वतरांगांबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय; खाणकामावर पूर्णपणे बंदी, राज्यांना आदेश

Belly Fat: वयाच्या तिशीनंतरच का वाढतो पोटाचा घेर? जाणून घ्या 'चरबी' वाढण्याची ४ कारणे

Maharashtra Live News Update: चित्रपट दिग्दर्शक सयाजी शिंदेंनी उभा केलेल्या देवराईला अचानक आग

'वंचित' आणि MIM ने निवडणुकीसाठी रणशिंग फुकलं; उमेदवारांची पहिली यादी जाहीर, कोणाला कुठून मिळाली संधी?

SCROLL FOR NEXT