Two Minor Girls Become Pregnant Following Abuse In Dombivali Saam Tv
मुंबई/पुणे

Dombivali Crime: डोंबिवली हादरली! २ अल्पवयीन मुलींवर बलात्कार, पीडिता राहिल्या गरोदर

Two Minor Girls Become Pregnant Following Abuse In Dombivali: डोंबिवलीमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. दोन्ही पीडिता गरोदर राहिल्या आहेत.

Priya More
  • डोंबिवलीत अल्पवयीन मुलींवर बलात्कार

  • पीडित मुली गरोदर राहिल्यानंतर प्रकरण उघड

  • दोन्ही आरोपींना पोलिसांनी केली अटक

  • या घटनांमुळे डोंबिवली हादरली

संघर्ष गांगुर्डे, डोंबिवली

कल्याणमध्ये १४ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच डोंबिवलीतून अशीच धक्कादायक घटना समोर आली आहे. डोंबिवलीमध्ये २ ठिकाणी अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याच्या घटना घडल्या. दोन्ही पीडित मुली गरोदर राहिल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. या दोन्ही प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी अटक केली असून याप्रकरणाचा तपास पोलिस करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवलीत २ अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली. एका प्रकरणात मानपाडा पोलिसांनी काजू निषाद या आरोपीला उत्तर प्रदेशमधून अटक केली. तर दुसऱ्या प्रकरणात रामनगर पोलिसांनी शुभम सरोजला बेड्या ठोकल्या आहेत. या दोन्ही प्रकरणातील पीडित मुली गरोदर राहिल्यानंतर या घटना समोर आल्या आहेत. पोलिस सध्या दोन्ही आरोपींची चौकशी करत आहेत. या घटनांमुळे डोंबिवलीत खळबळ उडाली असून मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

कल्याण रेल्वे स्थानकात १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी सौरभ सोनवणे या आरोपीला अटक केली. पीडित मुलगी अहिल्यानगरवरून आपल्या मामाला भेटण्यासाठी कल्याणला आली होती. ती कल्याणवरून मामाच्या घरी खोपोलीला जात होती. खोपोलीला जाण्यासाठी ती कल्याण रेल्वे स्थानकावर लोकलची वाट पाहत होती. आरोपीने तिच्या हातातील मोबाइल हिसकावून घेतला आणि तुला परत पाहिले असेल तर माझ्यासोबत पोलिस ठाण्यात चल असं आरोपी म्हणाला.

आरोपी पीडित मुलीला पोलिस ठाण्यात न घेऊन जाता तिला रेल्वे यार्डात घेऊन गेला. त्याठिकाणी आरोपीने पीडित मुलीवर बलात्कार केला. त्यानंतर आरोपीने पळ काढला. पीडित मुलीने कल्याण रेल्वे पोलिस ठाण्यात धाव घेत या प्रकरणी तक्रार दाखल केली. पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेत त्याला अटक केली. आरोपीला कोर्टात हजर केले असताना त्याला २१ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP Protest: कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन कधीपर्यंत सुरू राहणार? अभिजीत दीपकेने दिली महत्वाची अपडेट, सरकारला दिला थेट इशारा

Pune IT Job Scam: पुण्यात आयटी नोकरीच्या आमिषाने मोठा घोटाळा; ३०० हून अधिक तरुणांची फसवणूक, कॉर्पोरेट क्षेत्रात खळबळ

Maharashtra News Live Update: वादळी वाऱ्यामुळे केळीची बाग भुईसपाट

झेरॉक्सला मराठीत काय म्हणतात?

Nashik : नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार , अल्पवयीन मुलीची प्रसूतीनंतर बाळ विकलं; दोन नामांकीत डॉक्टरांसह ११ जणांना ठोकल्या बेड्या

SCROLL FOR NEXT