Disha Salian death case latest CBI investigation update saam tv
मुंबई/पुणे

Disha Salian Case : दिशा सालियान प्रकरणात ट्विस्ट येण्याची शक्यता, घटनास्थळी आदित्य ठाकरेंना पाहिल्याचा दावा, त्या पेनड्राइव्हमध्ये नेमकं काय?

Disha Salian Death Case Latest CBI Investigation Update: दिशा सालियन मृत्यू प्रकरणाच्या CBI तपासादरम्यान कथित नव्या पुराव्यांचा दावा समोर आला आहे. सतीश सालियन यांच्या बाजूने पेनड्राइव्हमध्ये कथित प्रत्यक्षदर्शीचा व्हिडिओ असल्याचे सांगण्यात आले असून, त्याची CBIकडून स्वतंत्र पडताळणी होणार आहे.

Omkar Sonawane

साक्षी यादव, साम टीव्ही

मुंबई: दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (CBI) सुरू असताना या प्रकरणात खळबळजनक माहिती समोर आली आहे. दिल्लीहून CBIचे अधिकारी मुंबईतील CBI कार्यालयात दाखल झाले आहेत. उद्या दुपारी 2 वाजता दिशा सालियन यांचे वडील सतीश सालियन आणि त्यांचे वकील CBI अधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. या भेटीदरम्यान CBIकडे पेनड्राइव्हच्या माध्यमातून काही महत्त्वाचे पुरावे आणि संबंधित साहित्य सुपूर्द केले जाणार असल्याचे सतीश सालियन यांच्या बाजूने सांगण्यात आले आहे. या पेनड्राइव्हमध्ये एका कथित प्रत्यक्षदर्शीचा व्हिडिओ रेकॉर्ड केलेला जबाब असल्याचा दावा करण्यात आला आहे.

या कथित प्रत्यक्षदर्शीने घटनास्थळी आदित्य ठाकरे आणि इतर काही व्यक्तींना पाहिल्याचा दावा केल्याचे सतीश सालियन यांच्या बाजूने सांगण्यात आले आहे. मात्र, या दाव्यांची सत्यता CBIने स्वतंत्रपणे तपासावी आणि उपलब्ध पुराव्यांची पडताळणी करावी, अशी मागणी करण्यात येणार आहे. प्रकरणाची माहिती असलेल्या इतर कथित प्रत्यक्षदर्शी आणि महत्त्वाच्या व्यक्तींची माहितीही CBIला देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. संबंधित व्यक्तींचे जबाब नोंदवून त्यांची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणीही केली जाणार आहे.

दरम्यान, 2 सप्टेंबर 2026 रोजी मुंबई उच्च न्यायालयाने दिशा सालियन यांच्या मृत्यू प्रकरणाचा तपास CBIकडे सोपवण्याचे आदेश दिले होते. CBIने FIR नोंदवून तपास करावा आणि तपासादरम्यान पुरेसे ठोस साहित्य मिळेपर्यंत कोणालाही आरोपी म्हणून संबोधू नये, असे न्यायालयाने स्पष्ट केले होते.

सतीश सालियन यांच्या बाजूने माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या सार्वजनिक मुलाखतीतील वक्तव्यांचाही तपासात समावेश करण्याची मागणी केली आहे. परमबीर सिंह यांच्याकडे व्हिडिओ किंवा इतर साहित्य असल्याच्या कथित वक्तव्यांची CBIने पडताळणी करावी, तसेच संबंधित साहित्य जतन करून त्याची स्वतंत्र चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच, परमबीर सिंह यांनी नार्को-विश्लेषण चाचणीची तयारी दर्शवल्याचा दावाही सतीश सालियन यांच्या बाजूने करण्यात आला आहे. त्यामुळे आता CBIकडे सादर होणाऱ्या कथित नव्या पुराव्यांकडे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर कृषी मंत्री दत्तात्रय भरणे उद्या नाशिक दौऱ्यावर

Thursday Horoscope: 3 राशींना मिळणार महत्त्वाच्या संधी; आर्थिक व्यवहारापासून करिअरपर्यंत जाणून घ्या दिवसाचं भविष्य

Feng Shui Turtle : भरपूर पैसा, नातंही फुलेल, 'ही' १ गोष्ट करेल घराचं गोकुळ; वास्तूशास्त्र काय सांगतं? जाणून घ्या

Pitrupaksh 2026 : पितृपक्षात 'या' ६ वस्तू चुकूनही खरेदी करू नका, पूर्वज होऊ शकतात नाराज

Maharashtra MLC Election: पाच जागा, दावेदार अनेक! महायुतीत जागावाटपावरून चढाओढ; राजकीय मोर्चेबांधणीला वेग

SCROLL FOR NEXT