दिशा सालियनचे वडील वकिलांसह मातोश्रीवर दाखल; शिवसैनिक मोठ्या संख्येने जमा; मोठी खळबळ|VIDEO

Disha Salian Case: दिशा सालियन प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे. सतीश सालियन वकिलांसह मातोश्रीवर दाखल झाले. आदित्य ठाकरेंविरोधातील 500 कोटींच्या अब्रुनुकसानीच्या दाव्याची नोटीस देण्यात आली. यावेळी मातोश्रीबाहेर मोठ्या संख्येने शिवसैनिक जमा झाले.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची मॅनेजर दिशा सलियन प्रकरणाला आता वेगळे लागले आहे. या प्रकरणाचा तपास CBI कडे गेल्यानंतर यात आदित्य ठाकरेंसह काही जणांच्या नावाचा उल्लेख आहे. यानंतर आदित्य ठाकरे यांनी सोशल मिडिया पोस्ट करत आपली बाजू मांडली. या पोस्टनंतर सतीश सलियन यांनी आदित्य ठाकरेंवर 500 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा करणार असल्याचे म्हटले होते, आज याबद्दलची नोटीस देण्यासाठी सतीश सलियन आणि वकील हे थेट मातोश्रीवर दाखल झाले.

यावेळी मोठ्या प्रमाणात हायव्होलटेज ड्रामा बांद्रा येथील कला नगरमध्ये पाहायला मिळाला. दिशा सालियनचे वकिल आणि वडील येणार हे समजताच उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी मोठ्या संख्येने शिवसैनिक जमा झाले. दरम्यान आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी सदर नोटिस स्वीकारली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com