Devendra Fadnavis on Uddhav Thackeray SAAM TV
मुंबई/पुणे

Devendra Fadnavis News: नेमकं फडतूस कोण हे अख्य्या महाराष्ट्राला महिती, देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार

Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. त्याला फडणवीसांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

Chandrakant Jagtap

Devendra Fadnavis reply to uddhav Thackeray: अडीच वर्षांचा त्यांचा कारभार पाहिल्यानतंर नेमकं फडतूस कोण हे अख्य्या महाराष्ट्राला महिती आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केला आहे.

ठाण्यात ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्याला मारहाण झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. त्याला फडणवीसांनी प्रत्युत्तर दिले आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, अडीच वर्षांचा त्यांचा कारभार पाहिल्यानतंर नेमंक फडतूस कोण हे अख्य्या महाराष्ट्राला महिती आहे. दोन दोन मंत्री जेलमध्ये गेल्यानंतर त्यांचा राजीनामा घेण्याची हिंमत देखील जे मुख्यमंत्री दाखवत नाहीत आणि जे मुख्यमंत्री त्या मंत्र्यांच्या भोवती लाळ घोटत असतात त्यांना बोलण्याचा अधिकार काय? जे मुख्यमंत्री वाझेच्या मागे लाळ घोटतात? ज्यांच्या काळात पोलीस खंडणी वसूल करतात त्यांना बोलण्याचा अधिकार काय? अशा शब्दात फडणवीस यांनी ठाकरेंवर पलटवार केला.

ते म्हणाले, अशा मुख्यमंत्र्यांनी मला राजकारण शिकवू नये. आम्ही तोंड उघडलं तर त्यांना बळताभूई थोडी होईल. आम्ही संयमाने वागणारे लोक आहोत, याचा अर्थ आम्हाला बोलता येत नाही असा नाही. ज्या दिवशी बोलू, त्या दिवशी पळताभूई थोडी होईल, त्यामुळे संयमाने बोला, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. (Latest Marathi News)

ठाण्यात शिंदे गटाच्या महिल्या कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाच्या एका महिला कार्यकर्त्याला मारहाण केल्याची घटना घडल्यानंतर ठाकरे गट आक्रमक झाल्याचा पाहायला मिळत आहे. उद्धव ठाकरे यांनी पीडित महिला रोशनी शिंदे यांच्या भेटीनंतर पत्रकार परिषद घेत भाजप-शिंदे गटातील नेत्यांवर जोरदार टीका केली आहे. 'फडतूस गृहमंत्र्याला पदावर राहण्याचा अधिकार नाही, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट टीका केली आहे.

राज्याला एक फडतूस गृहमंत्री आपल्याला लाभलेला आहे. उपमुख्यमंत्रिपदासाठी लाचार गृहमंत्री आपल्याला लाभला आहे. फडतूस गृहमंत्र्यांला पदावर राहण्याचा अधिकार नाही. मनात आणले तर यांना ठाण्यातून उखडून टाकू. गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. तसेच 'लाचार आणि बिनकामाच्या आयुक्तांचे निलंबन केले. गृहमंत्री लाचार नसतील तर त्यांनी कारवाई करावी. पोलीस आयुक्तांना निलंबित करा. असे लाचार पोलीस रक्षणकर्ते होऊ शकत नाही, अशी टीका ठाकरे यांनी केली. (Latest Political News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tiger Shroff Baaghi 4: टायगर श्रॅाफचा कधीही न पाहिलेला अवतार; खतरनाक लूक व्हायरल

Maharashtra News Live Updates: ही तर गुजरात नवनिर्माण सेना; उद्धव ठाकरेंची टीका

Assembly Election: 'जिथे कमी लीड तिथे तिकीट मिळणार नाही', सीएम शिंदेंची शिवसेनेच्या नगरसेवकांना तंबी

Eknath Shinde : मला जेलमध्ये टाका, मी काय ऐरागैरा नाही; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर नेम

Assembly Election: पक्षाने अजित पवारांना तीनदा उपमुख्यमंत्री बनवलं, आता युगेंद्र; सांगता सभेत शरद पवारांचे आवाहन

SCROLL FOR NEXT