Devendra Fadnavis Saam Tv
मुंबई/पुणे

Devendra Fadnavis Office : मंत्रालयाच्या सुरक्षेत मोठी चूक; गृहमंत्र्यांच्या ऑफिसबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीस म्हणाले... VIDEO

Devendra Fadnavis News : एका महिलेने थेट मंत्रालयाच्या सुरक्षेला चकमा देत मंत्रालयात धुडगूस घातलाय.. त्यामुळे मंत्रालयाची सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. मात्र महिलेने मंत्रालयाची सुरक्षा कशी भेदली? मंत्रालयात नेमकं काय घडलं? यावरचा स्पेशल रिपोर्ट...

Saam Tv

भरत मोहोळकर, साम टीव्ही

मुंबई : राज्याचं पॉवर सेंटर असलेल्या मंत्रालयातील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीसांच्या दालनाबाहेर महिलेने तोडफोड केली. कडेकोट सुरक्षा व्यवस्था. मात्र या सुरक्षेला चकमा देत या ना त्या प्रकारचे अपप्रकार घडत असतात. त्यातच आता एका महिलेने मंत्रालयाच्या सुरक्षेला छेद देत थेट मंत्रालयातील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या दालनाबाहेर तोडफोड करत घोषणाबाजी केली आहे. त्यामुळे मंत्रालयाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय...मात्र मंत्रालयात नेमकं काय घडलं? पाहूयात...

फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड

गुरुवारी सायं. 6.30 वा अज्ञात महिला विनापास मंत्रालयात घुसली. महिला थेट मंत्रालयातील 6 व्या मजल्यावर पोहचली. उपमुख्यमंत्र्यांच्या दालनाबाहेरची फडणवीसांच्या नावाची पाटी तोडत महिलेने घोषणाबाजी केली. उपमुख्यमंत्र्यांच्या दालनाबाहेर कुंड्यांची तोडफोड केली. मंत्रालयाचे सुरक्षारक्षक आणि पोलिस येऊस्तोवर महिलेने पोबारा केला.

मंत्रालायतील सुरक्षेला छेद दिल्याने विरोधकांच्या हाती आयतं कोलित मिळालंय. तर विरोधी पक्षनेते वडेट्टीवारांनी लाडक्या बहिणीवरून टोला लगावलाय. तर महिलेने तोडफोड का केली? त्याची माहिती घेणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय.

मंत्रालयातील तोडफोडीवरून राजकीय घमासान रंगलं असलं तरी साम टीव्हीने काही प्रश्न उपस्थित केलेत.

मंत्रालयाचं कामकाज बंद झाल्यानंतर महिलेला प्रवेश कसा मिळाला?

सचिव गेटमधून सचिवांनाच प्रवेश असताना महिलेला प्रवेश कुणी दिला?

तोडफोड करुन गेल्यानंतर महिलेला अडवलं का नाही?

प्रत्येक वेळी मंत्रालयात घडलेल्या अपप्रकारानंतर सुरक्षा व्यवस्था अंग झटकून कामाला लागते. त्यानंतर सुरक्षेत ढिलाई येते. मात्र आता थेट गृहमंत्रालयच असुरक्षित असल्याचं समोर आलंय. त्यामुळे सरकारने मंत्रालयाच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करणं आवश्यक आहे. नाहीतर ये रे माझ्या मागल्या हे ठरलेलंच.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: मोर्शीमध्ये भाजपचे उमेश यावलकर होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Bhandara News : धरणाच्या प्रवाहात मासेमारी करताना बुडून मृत्यू; मृतदेह वीज निर्मिती कार्यालयात नेट नातेवाईकांचा गोंधळ

Chanakya Niti: आजपासून स्वत:ला लावा या सवयी, पैशाची चणचण कायमची सुटेल

Maharashtra Exit Poll : कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य आमदार कोण? पाहा Exit Poll

Kalwan Exit Poll: कळवण मतदारसंघातून जे. पी. गावित होणार आमदार? काय सांगतो Exit Poll

SCROLL FOR NEXT