मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीमध्ये अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर महायुतीमध्ये मुख्यमंत्री कोण, या प्रश्नाचे उत्तर अजूनही स्पष्ट होऊ शकलेले नाही. भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस हेसंख्याबळाच्या जोरावर सहज मुख्यमंत्री होतील, असं वाटत असतानाच भाजपनं 'आस्ते चलो'ची भूमिका घेतल्यानं उत्कंठा वाढलीये. तर दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली निवडणूक झाल्याने त्यांनाच पुन्हा संधी मिळावी, यासाठी त्यांचे समर्थक आग्रही आहेत.
फडणवीसांच्या मुख्यमंत्रिपदावर दिल्लीत शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा असून तसा निरोप शिंदेंपर्यंत पोहोचल्याची माहितीय. त्यामुळेच शिंदे नाराज असल्याचा दावा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी केलाय. आणि हेच चित्र मुंबई पोलीस मुख्यालयातील शहीद स्मारकाला अभिवादनाच्या कार्यक्रमाता पाहायला मिळालं. शिंदे आले आणि त्यांनी फडणवीसांना केवळ औपचारिकता म्हणून नमस्कार केला. मात्र त्यांच्यात कुठलाही संवाद झाला नाही.
तर नाराजीनाट्याचा दुसरा अंक राजभवनात पाहायला मिळाला एकनाथ शिंदे राजीनामा देण्यासाठी दाखल होण्याआधीच देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार राजभवनात पोहचले होते. यावेळी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस एकत्र बसून चर्चा करत होते.
एकनाथ शिंदे राजभवनात दाखल होताच अजित पवारांनी आपल्या खुर्चीवरुन उठत देवेंद्र फडणवीसांना एकनाथ शिंदेंच्या बाजूला बसवलं. मात्र तरीही फडणवीस आणि शिंदेंमध्ये कुठलाही संवाद झाला नसल्याचं दिसून आलं. मात्र यात अजित पवारांनी योग्य टायमिंग साधल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली. आता या नाराजीनाट्यानंतर भाजपचे पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.