Ramdas Athawale : राज ठाकरेंच्या सभांना केवळ गर्दी, मतांचा दुष्काळ; लोकसभेचा दाखला देत रामदास आठवलेंनी लगावला टोला

Ramdas Athawale On Raj Thackeray : राज ठाकरेंच्या सभांना केवळ गर्दी होते, मात्र निवडून येण्याइतकी मतं मिळत नाहीत, असा टोला रामदार आठवले यांनी लगावला आहे.
Ramdas Athawale
Ramdas AthawaleSaam Digital
Published On

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत प्रचार केला होता. मात्र दसऱ्याच्या दुसऱ्याच दिवशी राज ठाकरे यांनी आता ना युत्या ना आघाड्या असं म्हणत विधानसभा निवडणुकीत स्वतंत्र लढण्याची घोषणा केली आहे. त्यावर आज रामदास आठवले यांनी खोचक टिपण्णी केली. राज ठाकरेंच्या सभांना केवळ गर्दी होते, मात्र निवडून येण्या इतकी मतं मिळत नाहीत. लोकसभा निवडणुकीतही महायुतीला त्यांचा फारसा फायदा झाला नाही असा टोला लगावला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज झाली आहे. आता कोणाशी आघाडी नको, कोणाशी युती नको असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वबळाची घोषणा केली आहे. तसेच विधानसभेनंतर मनसे हा सत्तेत असेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे मनसे राज्यता कोणत्या जागांवर निवडणूक लढवणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

आठवले का म्हणाले?

राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होते मात्र निवडून येण्याइतकी मतं मिळत नाहीत. लोकसभेला राज ठाकरेंचा फारसा फायदा महायुतीला झाला नाही, उलट नुकसान झालं. तसंच विधानसभेला कुठलीही हवा असली तरी आमच्याकडे निवडून येणारे उमेदवार आहेत. सरकारने लोक हिताचे निर्णय घेतले. लाकडी बहीणचा मोठा फायदा होईल. मध्यप्रदेशात शिवराजसिंह चौहान यांना आणि भाजपला मोठा फायदा झाला. राहुल गांधी यांचे खटाखट झाले नाही. मात्र आमचे उमेदवार पटापट पटापट निवडून येतील. एकनाथ शिंदें सरकारने सर्वच समाज घटकांसाठी निर्णय घेतले आहेत. तसंच मनोज जरांगें यांच्यासोबत काही सर्वच मराठा बांधव नाहीत.

Ramdas Athawale
Rain Alert : उत्तर भारतातून मान्सूनची माघार, दक्षिण भारतात मात्र पावसाळा; या भागात पुढचे ५ दिवस पावसाची शक्यता

विधानसभा निवडणुकीत मनासारख्या जागा दिल्या नाही तरी वेगळं लढण्याची आमची भूमिका नाही. तीन पक्षांकडे आमदारांची संख्या जास्त, मात्र माझा पक्षही छोटा नाही, असंही आठवलेंनी म्हटलं आहे. जास्त जागा मिळाव्यात या कार्यकर्त्यांच्या भावना असतात. आमच्यामुळे युतीची महायुती झाली. दोन मोठे पक्ष सोबत आल्याने RPI चे नाव घेतले जात नाहीत. कार्यक्रमांना मला बोलवू नका पण माझ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना बोलवा. माझ्या पक्षाच्या माध्यमातून महायुतीला मते मिळत. त्यामुळे किमान 7 ते 8 जागांची आमची मागणी मान्य व्हायला व्हावी, असं त्यांनी म्हटलं आहे.

Ramdas Athawale
Maharashtra Assembly Election : विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजले! २० नोव्हेंबरला मतदान, २३ तारखेला निकाल, EC कडून घोषणा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com