Maharashtra Politics Anil Deshmukh Vs Devendra Fadnavis:  Saamtv
मुंबई/पुणे

Devendra Fadnavis vs Anil Deshmukh : राज्यात 'पेन ड्राईव्ह'वरून राजकारण; आजी आणि माजी गृहमंत्री आमनेसामने, पाहा व्हिडिओ

Girish Nikam

मुंबई : राज्यात ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जुन्या प्रकरणावरून नवं राजकारण रंगलंय. ज्यात देवेंद्र फडणवीस आणि अनिल देशमुख हे आजी-माजी गृहमंत्री आमने-सामने आले आहेत. निमित्त ठरलंय अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी केलेल्या सनसनाटी आरोपांचं....

उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांना खोट्या आरोपांत अडकवण्यासाठी तत्कालीन देशमुखांवर फडणवीसांनी दबाव टाक होता, असा आरोप श्याम मानव यांनी केला होता. या दाव्यांना देशमुख यांनीही दुजोरा दिला. त्यानंतर फडवणीस यांनी अनिल देशमुखांना गर्भित इशारा देत त्यांचे व्हिडिओ पब्लिक करू, असे म्हटले होते. तर गुरुवारी देशमुखांनी थेट पेनड्राईव्हच बाहेर काढून फडणवीसांना आव्हान दिलं आहे.

ज्याच्यावरून हे आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झ़डतायत ते नेमकं काय प्रकरण आहे ते पाहूयात...

१०० कोटींच्या वसुली प्रकरणी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर एप्रिल 2021 मध्ये तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला होता. याप्रकरणात देशमुखांना अटक झाली होती. सध्या ते जामीनावर बाहेर आहेत.

मविआ सरकारच्या काळात विरोधी बाकांवर असलेल्या फडणवीसांनी अनिल देशमुख यांच्यासह निलंबीत पोलिस अधिकारी सचिन वाझेला दिलेल्या वसुली टार्गेट प्रकरणी सरकारला कोंडीत पकडलं होत. सत्तांतरानंतर पुन्हा एकदा नागपूरच्या या आजी-माजी गृहमंत्र्यांनी एकमेकांच्या व्हिडिओ क्लिप पब्लिक करण्याचा इशारा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

एकीकडे श्याम मानवांनी फडणवीसांवर आरोप केलेत तर दुसरीकडे CBIनं कोर्टात चार्जशीट दाखल केल्यानं देशमुखांच्या अडचणी वाढल्यात. लोकसभा निवडणुकीत पिछेहाट झाल्यानं महायुतीचे नेते आक्रमकपणे मविआ नेत्यांना घेरण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र थेट फडणवीसांवरच वार केल्यानं आजी-माजी गृहमंत्र्यांचा हा संघर्ष कुठल्या दिशेने जाणार ते पाहणं महत्वाचं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sri Lanka Tourism : श्रीलंकेत मनसोक्त आणि कमी खर्चात फिरता येणार; कसं वाचा संपूर्ण डिटेल्स

IOCL Recruitment: इंडियन ऑइलमध्ये अधिकारी होण्याची संधी; या पदासाठी सुरु आहे भरती; वाचा संपूर्ण माहिती

Nandurbar News : नंदुरबार दंगल..दगडफेक करणाऱ्या ४० जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात; शहरात तणावपूर्ण शांतता

Manoj Jarange Patil: उपोषणाचा चौथा दिवस, प्रकृती खालावली; मनोज जरांगेंचा उपचार घेण्यास नकार

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

SCROLL FOR NEXT