VIDEO: Ganpat Gaikwad यांना विधानपरिषद निवडणुकीमध्ये मतदान करण्याची परवानगी, काय म्हणाले Anil Deshmukh?

Anil Deshmukh on Ganpat Gaikwad: गणपत गायकवाड यांना विधानपरिषद निवडणुकीमध्ये मतदान करण्याची परवानगी देण्यात आली आहे, अनिल देशमुखांसाठी वेगळा न्याय आमि गायकवाडांसाठी वेगळा न्याय असा सवाल देशमुखांनी विचारला आहे.

गोळीबार प्रकरणात अटकेत असलेले भाजप आमदार गणपत गायकवाड हे विधानपरिषद निवडणुकीसाठी मतदान करणार आहेत, यावर कॉंग्रेसने विरोध दर्शवला आहे. गणपत गायकवाड यांना मतदान करण्यास परवानगी देऊ नये अशा प्रकारचं पत्र कॉंग्रेसने निवडणूक आयोगाला दिलं आहे. शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यावर पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केल्या प्रकरणी गणपत गायकवाड हे अटकेत आहेत. यावर अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. माझ्यावर खोटे आरोप लावून जेल मध्ये टाकण्यात आलं होत, तेव्हा देखील विधानपरिषद निवडणुका आल्या होत्या, मी कोर्टाकडे विधानपरिषदेच्या निवडणुकांमध्ये मतदान करण्याची परवानगी द्यावी, यासाठी मागणी केली होती, परंतु ती नाकारण्यात आली होती, परंतु भाजपने दबाव टाकून कोर्टाकडून गणपत गायकवाड यांना मतदान करण्याची परवानगी मिळवून दिली. असल्याचं अनिल देशमुख म्हणाले. भाजप सत्तेचा गैरवापर करत असल्याचं देखील अनिल देशमुख म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com