Devendra Fadnavis News, Uddhav Thackeray News
Devendra Fadnavis News, Uddhav Thackeray News Saam Tv
मुंबई/पुणे

महाविकास आघाडीचं सरकार हे बेईमानीचं सरकार होतं; फडणवीसांचा निशाणा

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : महाविकास आघाडीचं सरकार (Mahavikas Aaghadi) हे बेईमानीचं सरकार होतं असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला. येत्या १७ ऑगस्टपासून पावसाळी अधिवेशनाला सुरूवात होणार आहे. त्या अनुशंगाने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत पत्रकारपरिषद घेतली. या पत्रकारपरिषदेत ते बोलत होते. (Devendra Fadnavis Todays News)

विधानसभा निवडणुकीत एकत्रित येऊन मतं मागितली होती, ते दोन पक्ष मिळून आज सरकार स्थापन झालं आहे. महाविकास आघाडीचं सरकार बेईमानीनं आलं होतं. जनतेचा कल डालवून ते सरकार स्थापन झालं होतं. असं फडणवीस म्हणाले. महाविकास आघाडी सरकारमध्ये एकी नव्हतीच, तर जनतेच्या हिताचे निर्णय हे लांबच राहिले आहेत.असा टोलाही देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. इतकंच नाही तर, त्यांनी दोन सरकारमधील फरकही स्पष्ट करून सांगितला.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

महाविकास आघाडी हे सरकार फक्त शेतकऱ्यांच्या बाबतीतच बेईमान नव्हतं, तर ते सर्वच क्षेत्रासाठी नुकसानीचं होतं. असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मागच्या सरकारने जाहीर केलेली मदत ही शेतकऱ्यांना ९ महिन्यांनी मिळाली. आमच्या सरकारने तात्काळ निर्णय घेतला. पुरवणी मागण्या झाल्यानंतर आम्ही मदत द्यायला सुरुवात करू. आम्ही आताही मदत देऊ शकतो. मात्र काही प्रमाणात शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करणे बाकी आहेत. त्यामुळे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहोचेल असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. (Devendra Fadnavis vs Uddhav Thackeray)

'विरोधकांमध्ये एकी राहिली नाही'

देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना विरोधकांवर जोरदार टीका केली. आमची चिंता करण्यापेक्षा विरोधकांनी त्यांच्यामधील एकीची चिंता केली पाहिजे, तीन पक्षाच्या तीन वेगवेगळ्या दिशा दिसत आहेत. विधान परिषदेच्या विरोधी पक्ष नेत्याची निवड आम्हाला न विचारता केली असं काँग्रेस नेते बोलले आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली होती. असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, सत्तेत असतानाही तीन पक्षामध्ये एकी नव्हती आता विरोधी पक्षात गरज असतानाही एकी दिसत नसल्याचे फडणवीस यांनी सांगितले आहे. आधी मंत्रालय, सह्याद्री, मंत्र्यांचे बंगले रिकामे होते, आता इथे पाय ठेवायला जागा नाही. मुख्यमंत्री मी आमचे नेते मैदानात आहेत असे म्हणत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

AC Tips: उन्हाळ्यात ऐसी वापरताय? सेटिंग करताना 'या' चूका टाळा नाहितर...

SRH vs PBKS: हैदराबादविरुद्धच्या सामन्याआधी पंजाबने कर्णधार बदलला; या सामन्यासाठी अशी असेल दोन्ही संघांची प्लेइंग ११

Chiplun Heavy Rain : भर उन्हाळ्यात ढगफुटी सदृश्य पाऊस; चिपळून, अडरे भागात नद्या झाल्या प्रवाहित

Perfect Apple : बाहेरून मस्त दिसणारा सफरचंद आतून खराब निघतो; वाचा गोड आणि टेस्टी Apple ओळखण्याच्या टिप्स

Tomato Side Effects: या लोकांनी टोमॅटो खाणे आरोग्यासाठी घातक

SCROLL FOR NEXT