मुंबई : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या निमित्ताने १७ ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता सामूहिक राष्ट्रगीत होणार आहे. त्यामुळे उद्या सकाळी ११ वाजता नागरिकांनी आहे त्या ठिकाणी उभे राहून राष्ट्रगीत गायन करण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात आलं आहे. या सामूहिक राष्ट्रगायनात राज्यातील खासगी, शासकीय तसेच इतर सर्व शाळा महाविद्यालय शिक्षनिक संस्था विद्यापीठ मधील शिक्षक विद्यार्थी सहभाग असणार आहे. (National Anthem Tomorrow Morning At 11 Am)
राज्य सरकारकडून याबाबतचा जीआर काढण्यात आला आहे. खासगी आस्थापना व्यापारी प्रतिष्ठाने संस्था ह्यांनी सक्रिय सहभाग घ्यावा असं आवाहनही राज्य सरकारकडून करण्यात आलं आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या "स्वराज्य महोत्सवाचे" आयोजन सुरू असून या महोत्सवाअंतर्गतच, सामूहिक राष्ट्रगीत गायन ही संकल्पना राबवण्यात येणार आहे.
परिपत्रकात काय म्हटलंय?
सामूहिक राष्ट्रगीत गायनासंदर्भात राज्य शासनाने सविस्तर शासन निर्णय जारी केला आहे. याबाबतची माहिती सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय यांनी दिली आहे. देशभक्ती, देशप्रेम आणि आपली उज्वल परंपरा जपण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम आपण राबवत आहोत. नागरिकांच्या मनात आपला राष्ट्रध्वज आणि आपले राष्ट्रगीत याविषयी पवित्र भावना आहेच, त्याच पवित्र भावनेला सामूहिक राष्ट्रगीत गायनाच्या माध्यमातून जगाच्या समोर आणण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. (Eknath Shinde Todays News)
सर्वांनाच सहभागी होण्याचं आवाहन
राज्यातील अंगणवाड्या, सर्व प्रकारच्या शाळा, महाविद्यालये, सर्व प्रकारची विद्यापीठे, खाजगी, शासकीय सर्व शैक्षणिक संस्था मधील विद्यार्थी, व्यापारी प्रतिष्ठाने, सेवा पुरवठादार, शेतकरी, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच राज्यातील इतर सर्व नागरिक यांनी या उपक्रमात सहभाग घेणे अपेक्षित आहे. नागरिकांनी ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी राष्ट्रगीताचा सन्मान ठेवून या उपक्रमात सहभागी व्हावे. असं आवाहन या परिपत्रकातून करण्यात आलं आहे.
Edited By - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.